आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:पावसाने पूल पाण्याखाली; दीडशेवर विद्यार्थी अडकले, ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालत विद्यार्थ्यांना पैलतीरावर सोडले

तुळजापूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुसळधार पावसाने कार्ला उंडरगाव पूल पाण्याखाली जाऊन शाळेत गेलेले १५० विद्यार्थी-विद्यार्थिनी अडकल्याची घटना कार्ला येथे सोमवारी (२६ सप्टेंबर) दुपारी घडली.

ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालत पुलावर मानवी साखळी करून सर्व विद्यार्थ्यांना पैलतीरावर सोडले. सतत पाण्याखाली जाणाऱ्या कार्ला- उंडरगाव रस्त्यावरील पुलाची ऊंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. सोमवारी (दि. २६) दुपारी १२ च्या सुमारास कार्ला येथे तासभर मुसळधार पाऊस झाला. यामुळेकार्ला-उंडरगाव पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आले. वरच्या बाजूला असलेला कार्ला पाझर तलाव तुंडूब भरल्याने पाण्याच्या वेग वाढला. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने वाहतूक ठप्प झाली.