आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांची पाहणी:पूल वाहून गेला, रस्ता वाहतुकीस बंद ; चार दिवसात चालू करून देण्याचे आश्वासन

तेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील तेर डकवाडी रोडवरील नळकांडी पूल गेल्या महिन्यातील पावासाने वाहून गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली परंतु, दुरुस्तीचा त्यांना विसर पडला आहे. रस्ता चार दिवसात चालू करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, पंधरा दिवस उलटूनही कोणताही आधिकारी रस्त्याकडे पुन्हा फिरकला नाही. अथवा कामही चालू झाले नाही. गेल्यावर्षी हा पुल वाहून गेल्याने वाहतुकीसाठी बंद होता.

या भागातील शेतकऱ्यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर या रस्त्यावर जिल्हा परिषदेने तात्पुरती दुरुस्ती केली होती. या कामात ठेकेदाराने दगड व मुरूम मोठ्या प्रमाणात भरल्यामुळे गेल्या महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने रस्ता वाहून जाऊन पुलाच्या नळ्याही वाहून गेल्या. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी हा रस्ता पुन्हा बंद पडला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांनी मोठ्या लवाजम्यासह या पुलाची गेल्या पंधरवड्यात पाहणी केली. तातडीने दुरुस्तीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. परंतु, त्याचा विसर या आधिकाऱ्यांंना पडला आहे. प्रशासनाचा हलगर्जीपणा एकदिवस वाहनधारकांच्या जीवावर उठणार असून तातडीने या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...