आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूर येथे झालेल्या ज्युनिअर राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत दि उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट ज्युदो असोसिएशनचे ज्युदोपटू प्रसाद निंबाळकर आणि ओंकार चौरे यांनी कांस्यपदक पटकावले आहे.९ ते ११ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा झाली. १०० किलोखालील गटात प्रसाद निंबाळकर याने व १०० किलो पुढील गटात ओंकारने कांस्य पटकावले.
प्रशिक्षक म्हणून बालाजी चव्हाण तर संघ व्यवस्थापक म्हणून आदर्श तापकिरे यांनी काम पाहिले. विजेत्यांना संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अशोक जंगमे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, स्पर्धा विभाग प्रमुख प्रताप राठोड प्रशिक्षक कैलास लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.