आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:गणेशोत्सवामध्ये सांस्कृतिक उपक्रम राबवून आपली ओळख निर्माण करा; अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांचे बैठकीत आवाहन

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपली संस्कृती सण-उत्सवप्रिय आहे. उत्सव साजरे करताना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवणे आवश्यक आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही. याची आपण दक्षता घ्यावी. गणेशोत्सव काळात सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक आदी उपक्रम राबवून तालुक्याची ओळख निर्माण करावे, असे अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी आवाहन केले.

गणेशोत्सवानिमित्ताने सोमवारी (दि. २९) शहरातील चिंचोळे मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता तालुका शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी कावत बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, उपविभागीय कार्यालयाचे श्री पांचाळ, नायब तहसीलदार रतन काजळे, पालिका मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम आळंगेकर, व्यापारी महासंघ माजी अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, मुस्लिम जमातचे बाबा औटी, अलिम विजापुरे, महावितरण विभागाचे जाधव शिवप्रसाद लड्डा, सोमनाथ येळापुरे, माजी नगरसेवक महेश माशाळकर यांच्यासह तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी, विविध जाती-धर्मातील प्रमुख उपस्थित होते.

पुढे बोलताना कावत म्हणाले की, उत्सवातून जमा होणाऱ्या वर्गणीतून जास्तीत जास्त गरिब कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करून तालुका शांतताप्रिय असून जाती-धर्मामध्ये नांदत असलेला सलोखा कायम ठेवून गणेशोत्सव काळात मंडळ व अन्य ठिकाणी उदभवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यास पोलीस यंत्रणा बंदोबस्तात सज्ज असून डॉल्बी सारख्या ध्वनिप्रदूषणास फाटा देऊन उत्कृष्ट सामाजिक अन् पर्यावरण संवर्धनाचे देखावे सादर करत शिस्तबद्ध पध्दतीने उत्सव करावे असे आवाहन केले.

उपअधीक्षक रमेश बरकते प्रास्ताविकात म्हणाले, तालुक्यात शांतता व सुव्यवस्थेसाठी जाती-धर्म,पक्ष, संघटनाचे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक आहे. उत्सव सर्वांच्या सहकार्याने शांततेत साजरा व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी जगदीश सुरवसे,मनोज जाधव, श्री. चिंचोळे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमासाठी सहायक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, आर बी जाधवर, पोलीस उपनिरिक्षक रमाकांत शिंदे,अनुसया माने,पोलीस कर्मचारी लक्ष्मण शिंदे,वाल्मिकी कोळी यासह कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. रोटरीचे प्रवीण स्वामी यांनी सूत्रसंचलन केले. पोलिस निरीक्षक राठोड यांनी आभार मानले.

आदर्श निर्माण करा
काँवत पुढे म्हणाले की, सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सव साजरा करताना सामाजिक सुधारणेला प्राधान्य द्यावे या दरम्यान वृक्षारोपण, रक्तदान, युवक-युवती व महिलांची वैद्यकीय तपासणी शिबिर, वयस्कर नागरिकांना मदत आदी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून वेगळा आदर्श निर्माण करावा.

बातम्या आणखी आहेत...