आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकामाचे आयोजन:पोळा सणानिमित्त अनेक  विद्यार्थ्यांकडून  बैल मूर्तींना रंग

परंडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जिजामता शाळेतील विद्यार्थ्यांनी बैलपोळ्याच्या सणा निमित्त मातीपासून बनवलेल्या बैल मुर्तीवर रंग भरले. जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर शाळेत बैलपोळा सणांच्या पार्श्वभूमीवर कार्यानुभव विषयाअंतर्गत मातीपासून बैल तयार करणे उपक्रम राबवण्यात आला. कृतीद्वारे शिक्षण या संकल्पने वर भर देण्यात आला.शाळेचे मुख्यध्यापक सत्यजित घाडगे यांनी या कार्यकामाचे आयोजन केले होते.

यावेळी ज्वारी, तांदूळ,हरभरे यांच्या सहाय्याने डोळे सजवण्यात आले. या उपक्रमात इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थनी सहभाग घेतला.उपक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष गवळी, संतोष पाटील, नितीन शिंदे, नितीन पाबळे, राजेंद्र जाधव, ज्योती दिवाने,शिला कांबळे, मंगल हिंगणकर, तबस्सुम मोमीन, देशमुख सुजाता,आगरकर सुवर्णा, जगताप सुजाता,गवारे अश्विनी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...