आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग:वाकडी येथे उभा ऊस जळून खाक ; लाखो रुपयाचे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

परंडा22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वाकडी येथील रविंद्र अंधारे व दिलीप अंधारे या दोन शेतकऱ्यांचा सुमारे साडेतीन एकर क्षेत्रावरील तोडणीस आलेला उभा ऊस विजेच्या तारेच्या घर्षणामुळे ऊसाला आग लागून जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती त्वरित कामगार तलाठी यांना देण्यात आली. ऐन हिवाळ्याचे दिवस असताना शनिवार (दि.५) एक वाजता शॉर्टसर्किट झाल्याने ऊसाला मोठी आग लागली. आगीमुळे रविंद्र अंधारे यांचा ८६०३२ जातीचा दोन एकर व दिलीप अंधारे यांचा २६५ जातीचा दीड एकर वरील तोडणीस आलेल्या उसाने त्वरित पेट घेतला.

यामुळे अंधारे यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या अगोदरही अनेक वेळा महावितरण अधिकाऱ्यांना शेतात विद्युत तारांचा एकमेकांना संपर्क होत असल्याने या तारांचा बंदोबस्त करा, अशी मागणी वेळोवेळी केली होती. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ऐन दुपारच्या वेळेत अचानक लागलेल्या या आगीमुळे येथील शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. शेजारील या भागातील शेतकऱ्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. अन्यथा शेजारील शेतकऱ्याच्या पंचवीस एकर उसालाही आग लागून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते.

बातम्या आणखी आहेत...