आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बस-टेम्पोची धडक; एकाचा मृत्यू, 19 जखमी

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव-पंढरपूर रस्त्यावरील पानगाव पाटी जवळ बस व एका टेम्पोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात टेम्पोतील एकाचा मृत्यू झाला असून इतर १९ व्यक्ती जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या सहा प्रवाशांना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास कळंब आगाराची कळंब-बार्शी ही बस परत येत होती. यावेळी येरमाळा ते पानगाव दरम्यानचा ब्रिज पास केल्यानंतर पानगाव येथे बस क्रमांक (एमएच २० बीएल २५९०) आणि समोरुन येणारा एमएच ११ टी २०३६ या टेम्पोची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, टेम्पोतील सोनू अशोक धोंगडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर टेम्पो मालक श्यामसुंदर धर्मराज कवडे गंभीर जखमी असून त्यांना सोलापूर येथे हलवण्यात आले आहे. यात रामराजे धोंगडे व अनंत कवडे हे थोडक्यात बचावले. बसमध्ये ४० प्रवासी प्रवास करत होते. मात्र, यापैकी अपघातात १८ प्रवासी जखमी झाले आहेत. सहा गंभीर प्रवाशांना उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात ४ उपचार सुरु आहे. भरत वाघमोडे (कळंब), रामदास शिंदे, विष्णु गायकवाड (दोघेही हिंगने खुर्द पुणे), चंद्रकांत तोडकरी (बार्शी), दाऊद शेख, कासीम शेख दोघे (पाथरी ता. बार्शी), सर्जेराव गाढवे चोराखळी, लक्ष्मण गाढवे (शेलगाव दी), संजीवनी परतापुरे (सोलापूर), स्वाती पेहरकर (पिसेगाव ता. केज), छबुराव रितापुरे (मंगरूळ), संगीता कुंभार, अंजना गोडसे (दोघी इंदापूर ता. वाशी), शामल बांगर, धोत्रे ता. बार्शी या १३ जखमी प्रवाशांना कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...