आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:परंपरा खंडित करुन शिराढोणचा सत्ताधाऱ्यांना कौल

शिराढोण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील प्रतिष्ठेच्या व सर्वात मोठया ग्रामपंचायतीसाठी पार पडलेल्या निवडणूकीचा कौल मंगळवारी हाती आला. सत्ता परिवर्तनाची परंपरा खंडित करुन गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच शिराढोणच्या मतदारांनी सत्ता नियमित करत, पद्माकर पाटील व नितीन पाटील यांच्या पॅनल मधील सरपंच पदाचे उमेदवार लक्ष्मी दिलीप म्हेत्रे यांना विजयी करुन चालू सत्ताधा-यांच्या बाजूने कौल दिला. यात सरपंच पदाच्या उमेदवारासह ७ सदस्य उमेदवारांना निवडून देत विद्यमान सरपंच पद्माकर पाटील व त्यांचे सहकारी नितीन लक्ष्मण पाटील यांनी शिराढोण ग्रामपंचायतीची सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले.

सर्व ठोकताळे फोल ठरवत शिराढोणचे विद्यमान सरपंच पद्माकर पाटील यांनी गावाच्या इतीहासात पहिल्यांदाच सत्ता कायम ठेवण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला. या अटीतटीच्या ठरलेल्या निवडणूकीत एकूण तीन पॅनलनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. गेल्या सहा महिन्यात घडलेल्या संवेदनशील मुद्दयांचा विचार करता गावातील मतदारांचीही कसोटी लागली होती.

या निवडणूकीत भाजपा अंतर्गत बंडाळी माजल्याने महाविकास आघाडी आपले राजकिय उद्दिष्ट साध्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु सर्व अंदाज व भाकीते फोल ठरवत शिराढोणच्या मतदारांनी विद्यमान सरपंच पदमाकर पाटील व त्यांचे सहकारी नितीन पाटील यांच्या पारडयात मताचे दान दिले.

याचाच परिणाम म्हणून आज जाहीर झालेल्या निकालानुसार १७ पैकी ७ व सरपंच पदाचा उमेदवार विजयी करुन गावातील मतदारांनी पद्माकर पाटलांना सत्ता सलग दुसऱ्यांदा बहाल केली. याविरुध्द भाजप प्रणित अमोल माकोडे यांच्या पॅनल मधील ४ सदस्य तसेच महाविकास आघाडी या पॅनल मधील ६ सदस्य विजयी झाले.

एकूण तीन पॅनल मध्ये अटीतटीची लढत
पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण तीन पॅनल आमने सामने होते. यात भाजप प्रणित २ तर महाविकास आघाडी प्रणित १ यांचा समावेश आहे. यात सरपंच पदासाठी भाजप प्रणित पद्माकर पाटील व नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या सरपंच पदासह सदस्य पदासाठी ७ उमेदवारांना जनतेने आपला कौल दिला.

यात सरपंच पदासाठी लक्ष्मी दिलीप म्हेत्रे यांनी तब्बल २७१ मताची आघाडी मिळवत विजय नोंदवला तर त्यांच्या पॅनलचे ७उमेदवार सदस्य म्हणून विजयी झाले. महाविकास आघाडी पॅनल कडून सदस्य पदासाठी ६ उमेदवारांना विजय मिळवण्यात यश मिळाले. उर्वरित ४ सदस्य उमेदवार हे भाजपच्याच अमोल माकोडे यांच्या पॅनल मधून विजयी झाले.

बातम्या आणखी आहेत...