आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:शेततळे अस्तरीकरण घटकाअंतर्गत 30  डिसेंबरपर्यंत नोंदणीचे आवाहन

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत सामुहीक शेततळे व वैयक्तीक शेततळे अस्तरीकरण घटकांतर्गत प्लास्टीक फिल्म पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्यांचे विक्रेते व वितरकांनी यांनी ३० डिसेंबरपर्यंत जिल्हास्तरावर नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांनी केले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत सामुहीक शेततळे व वैयक्तीक शेततळे अस्तरीकरण घटकांतर्गत प्लास्टीक फिल्म पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्यांची महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्याकडे राज्यस्तरीय नोंदणी करीता पात्र असतील अशा कंपन्याचे वितरक किंवा विक्रेता जिल्हास्तरावर नोंदणी करीता पात्र राहतील. अशा उप्तादक कंपन्याच्या विक्रेते वितरकांची जिल्हास्तरावर दि १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत नोंदणी प्रकीया राबविण्यात आली होती. परंतु ३० डिसेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...