आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पारंपारिक शिक्षणाऐवजी तांत्रिक शिक्षण घेण्याचे आवाहन ; व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

उस्मानाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेडिओ तेरणा 90.4 एफएम, युनिसेफ, सेंटर फॉर सोशल अँड बिहेविहर चेंज कम्युनिकेशन यांच्या वतीने करिअर आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिराच्या एक दिवसीय कार्यशाळेचे व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय उस्मानाबाद येथे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे कोषाध्यक्ष शेषाद्री डांगे, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम डी पाटील, व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत चौधरी, आर्य चाणक्य विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनीष देशपांडे, डॉ. अभय शहापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती; तर मुख्य मार्गदर्शक म्हणून मोटिवेशनल स्पीकर अर्शद सय्यद आणि प्रा. महादेव खामकर हे या कार्यक्रमास उपस्थित होते; या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेडिओ तेरणाचे स्टेशन डायरेक्टर संजय मैंदर्गे यांनी केले.

यामध्ये रेडिओ तेरणा आणि युनिसेफ यांच्या वतीने रेडिओ तेरणावर अनेक कार्यक्रम जे की महिला आणि विशेष करून मुलींच्या विविध समस्या यावर प्रसारित होत असल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रसंगी बोलताना डॉ. अभय शहापूरकर म्हणाले की , मुलींनी केवळ आज्ञा म्हणून पालकांच्या गोष्टी न पाळता त्याचा मार्गदर्शक तत्व म्हणून वापर करावा .तसेच एक मुलगी शिकली तर ती केवळ स्वतःचाच नाही तर संपूर्ण पिढीचा उद्धार करू शकते असेही ते म्हणाले मुलींनी आता केवळ आणि केवळ पारंपारिक शिक्षण न घेता तांत्रिक शिक्षण घ्यावे त्याचबरोबर मुलींसाठी आता डायट कॉलेजमध्ये विना शुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल गुप्ता यांनी दिली.याचबरोबर महिन्याच्या एका दिवशी स्वतंत्र करिअर मार्गदर्शन यंत्रणा राबवणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

इच्छा आणि कठोर परिश्रमाची तयारी हवी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप श्री शेषाद्री डांगे यांच्या भाषणाने झाला कोणतीही गोष्ट जर आपल्याला करावयाची असेल तर त्यासाठी आपण इच्छा निर्माण केली पाहिजे आणि इच्छा केवळ निर्माण न करता ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे म्हणजेच आपण यश मिळवू शकतो असं सांगितलं; या कार्यक्रमास व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय, आर्य चाणक्य विद्यालय आणि वोकेशनल महाविद्यालय विद्यार्थिनीं, प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...