आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील शरणप्पा मलंग विद्यालयात इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना विषयानुरूप मार्गदर्शन होण्यासाठी मंगळवार (३१) पासून विषय तज्ञ शिक्षकांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण हे माणसाला जीवन जगण्याची प्रेरणा देते. निश्चित केलेले ध्येय जिद्द आणि चिकाटीच्या बळावर प्राप्त करता येतात त्यासाठी कठीण परिस्थितीवर मात करण्याची क्षमता ज्यांच्यात आहे तेच जीवनात यशस्वी होतात. दहावीच्या या परिक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे सखोल ज्ञान होण्यासाठी तालुक्यातील विषयतज्ञांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी शिबिराचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापक अजित गोबारे यांनी सांगितले.
मार्गदर्शन शिबिराची सुरुवात जय स्वामीनारायण विद्यालय समुद्राळ येथील हिंदी विषयाचे तज्ञ सहशिक्षक नरसिंग सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना दहावी बोर्ड परीक्षेला यशस्वी पणे सामोरे जाण्यासाठी व हिंदी विषयांमध्ये सर्वोत्तम गुण घेण्यासाठी कसा अभ्यास करावा याबाबत मार्गदर्शन केले तर संस्कृत विषयाचे मार्गदर्शन आदर्श विद्यालयाच्या शिक्षिका निलिमा इनामदार यांनी केले.
संस्कृत विषयांत शंभर टक्के गुण मिळविले पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतरावर भर न देता संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेऊन त्याचे आकलन करून घ्यावे व अचूक प्रश्नांची उत्तरे लिहावीत असे सांगितले. दोन ही विषय शिक्षकांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विषय शिक्षक सतिश कटके आणि परमेश्वर कोळी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. दहावी नंतर मुलांच्या करिअरच्या दिशा बदलतात. त्यामुळे त्यांना अशा मार्गदर्शनाचा उपयोग होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.