आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात तहसील कार्यालय लोहारा यांच्या मार्फत शनिवारी (दि.३) नवमतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी तहसीलदार संतोष रुईकर, नायब तहसीलदार डी. पी. स्वामी, महसूल सहाय्यक वजीर अत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून महाविद्यालयातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले.
तहसीलदार संतोष रूईकर व नायब तहसीलदार डी. पी. स्वामी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व पटवून देऊन अठरा वर्ष पूर्ण होण्यास काही महिने शिल्लक असतानाही मतदार नोंदणी करता येते. तसेच मतदान ओळखपत्र १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मिळते याबाबत मार्गदर्शन करून भारतीय निवडणूक आयोगामार्फत वर्षातून चार वेळेस मतदार नोंदणी मोहीम राबविली जाते त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी निव्वळ मतनोंदणी करून चालणार नाही तर प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा अधिकार वापरणे सक्षम लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचे मत तहसीलदार संतोष रुईकर यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी फॉर्मचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी केले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सानिका बादुले यांनी सूत्रसंचालन केले.राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. डी. निकम यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.