आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण विरोध:मोहीम थंडावली, महाद्वार परिसर गेला अतिक्रमणाच्या विळख्यात

तुळजापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक दिवसांपासून पालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम थंडावली. त्यामुळे महाद्वार परिसर अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग आणि फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडला. अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे शहरातील प्रमुख रस्त्यावरून मार्ग शोधताना दमछाक होत आहे. दरम्यान, प्रशासक पालिकेकडे फिरकत नाहीत तर मुख्याधिकारी बदलीच्या प्रयत्नात असल्याने पालिकेचा कारभार ढेपाळला आहे.तुळजापूर नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे शहरातील अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणात हरवले आहेत. यामुळे भाविकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मात्र नगर पालिका तसेच पोलिस शहरातील अतिक्रमण व बेशिस्त पार्किंगवर कारवाई करण्यात टाळाटाळ करत असल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.पालिकेतील निर्वाचित सदस्यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपला असल्याने गेल्या ७ महिन्यापासून नगर पालिकेवर प्रशासक आहे. उपविभागीय अधिकारी पालिकेवर प्रशासक आहेत, मात्र प्रशासक पालिकेकडे फिरकतच नाहीत. नगरपरिषेचे मुख्याधिकारी बदलीच्या प्रयत्नात असल्याने त्यांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत. तसेच शहरात प्लास्टिकबंदीही कागदावरच राहिली आहे

लवकरच कारवाई करणार
नगरपालिका ‘हर घर तिरंगा’ मोहिमेची तयारी करत असून, लवकरच पालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात येणार आहे.
वैभव पाठक, कार्यालयीन अधीक्षक,नगरपालिका

बातम्या आणखी आहेत...