आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:पीक विम्याकडे  राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोहीम ; उच्च न्यायालयाचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश

उमरगा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे खरीप २०२० मधील नुकसानीपोटीची रक्कम सहा आठवड्यात कंपनीला शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी बाध्य करणे बाबत भाजपकडून राज्य सरकारचे यांचे लक्ष वेधण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या सहा आठवड्याच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असून सदर विमा कंपनीने विमा न दिल्यास त्यानंतर राज्य शासनाने देण्याचा एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मात्र तीन आठवडे उलटून गेलेतरी पिक विमा याबाबत अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने, खरीप पेरणी पूर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळावी याकरिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष ॲड नितीन काळे, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, युवराज जाधव, हंसराज गायकवाड,सिद्धेश्वर माने, प्रा विवेक टाचले, अनिल बिराजदार, सागर पाटील,जयवंत कुलकर्णी आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...