आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअटल भूजल योजनेंतर्गत उमरगा तालुक्यातील भगतवाडी, चिरेवाडी, कोळेवाडी, नाईचाकूर व सावळसूर या ठिकाणी गुरुवारी (दि. ३०) ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभे दरम्यान क्षमता बांधणी प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच ‘कॅच द रेन’अंतर्गत जलप्रतिज्ञा घेण्यात आली.
प्रशिक्षणात लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडा तयार करणे, पाण्याचे अंदाजपत्रक मांडणे, भूजलाची गुणवत्ता टिकवणे व सुधारणा करणे, यासाठी नियोजन टप्प्यातील या ग्रामस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषितज्ज्ञ प्रशिक्षक एच. बी. काबुगडे, डी. सी. राठोड, शुभम काळे, सरपंच सिद्राम पालमपल्ले, उपसरपंच भाग्यश्री करनुरे, ग्राप सदस्य दिगंबर वाघमोडे, ग्रामरोजगार सेवक वैजिनाथ करनुरे, पांडुरंग चिरे, मुख्यमंत्री दूत गडकर, ग्रामसेवक जी. एस. बुलबुले यांच्यासह नागरिक, व्हीएसटीएफ फेलो, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, ग्रामरोजगार सेवक, जलसुरक्षक, महिला बचत गट सदस्य व इतर सदस्य उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान अटल भूजल योजनेची माहिती, वैशिष्ट्ये, उद्दिष्टे व भूजलाची सद्यःस्थिती आणि मागणी व पुरवठा आधारीत कामाबाबत माहिती देण्यात आली. मागणी आधारित पाणी बचतीच्या उपाययोजना, ड्रीप, स्प्रिंकलर, रेनपाइप, मल्चिंग, मुरघास याचा जास्तीत जास्त वापर करावा. पुरवठा आधारित जलसंधारण, भूजल पुनर्भरणाच्या विविध उपाययोजना राबवण्यात याव्यात. अभिसरणातून विविध विभागाशी एक केंद्राभिमुखता साधून विविध विभागातील योजनेचा लाभ घ्यावा. प्रत्येक गावात लोकसहभागातून जलसुरक्षा आराखडा बनवण्यात यावा व याची प्रभावी अंमलबजावणी ग्रामस्थांनी करावी, असे समाजविकास तज्ञ प्रशिक्षक ब्रम्हदेव माने यांनी सांगितले. शिवाय “कॅच द रेन” अभियानांतर्गत जलप्रतिज्ञा घेण्यात आली. प्रशिक्षणात ग्रामपंचायत सदस्य, गावातील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.
जलसुरक्षा आराखड्यानुसार भूजल गुणवत्ता सुधारण्याचे नियोजन
जलसंधारणासह पुनर्भरणही
पावसाचे वाहून जाणारे पाणी प्रकल्पासह भूगर्भात मूरवले तर पाणीटंचाई उद्भवणार नाही. मागील १० वर्षांत अनेकदा नागरिकांनी दुष्काळ अनुभवला. यावर मात करण्यासाठी जल पुनर्भरणाची गरज आहे. यामुळे गरज पडल्यास पाणी मिळवता येते. यासाठी लोकसहभाग व युवकांचा पुढाकार आवश्यक आहे. तसेच शासनाच्या वतीने जनजागृती करण्याची गरज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.