आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्धापनदिन साजरा:समता सैनिक दलाचा‎ वर्धापनदिन साजरा‎

उमरगा‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समता सैनिक दलाचा ९६ वा‎ वर्धापन दिन व कराळी येथे होणारी‎ धम्म परिषद, भीमराव आंबेडकर‎ यांच्या उपस्थितीत होत असलेल्या‎ भारतीय बौद्ध महासभा तालुका‎ शाखेच्या वतीने समता सैनिक‎ दलाचे एक दिवसीय प्रशिक्षण‎ शिबिर रविवारी (१२) संपन्न झाले.‎ भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने‎ समता सैनिक दलाचा ९६ वा‎ वर्धापनदिन साजरा करून रविवारी‎ समता सैनिक दलाच्या सैनिकांचे‎ एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराची‎ सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ यांच्या पुतळ्यास अभिवादन व‎ पंचशील ध्वजारोहणाने झाली.‎ यावेळी पुण्याचे प्रशिक्षक मेजर‎ अनिल कांबळे यांनी ग्राउंड, संस्कार‎ आणि लेखीपरीक्षा घेऊन सहभागी‎ शिबिरार्थींना मार्गदर्शन, माहिती‎ देण्यात आली. यावेळी मान्यवरांचे‎ मार्गदर्शन झाले.

प्रशिक्षण शिबिरात‎ शहरासह ग्रामीण भागातून आलुर,‎ धमोरी, तुरोरी, कोरेगाव, एकुरगा,‎ कुन्हाळी, तुगांव, औराद, येणेगुर,‎ मुळज, तुगाव आदी गावातील‎ महिला-पुरुष, युवक-युवती‎ सहभागी झाले होते. शिबिराच्या‎ अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष‎ दिलीप गायकवाड होते. यावेळी‎ जिल्हाध्यक्ष दिलीप निकाळजे, प्रा.‎ किरण सगर, पर्यटन प्रमुख विश्वास‎ पांडागळे, महिला प्रमुख शिलाताई‎ चंदनशिवे आदी उपस्थित होते.‎ प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेसाठी‎ संतोष सुरवसे, अविनाश भालेराव,‎ प्रा. संजीव कांबळे, किरण कांबळे,‎ राजेंद्र सूर्यवंशी, शिवानंद भंडारे,‎ दयानंद कांबळे, जीवन सूर्यवंशी,‎ लताताई कोल्हे, प्रभाकर‎ गायकवाड, उद्धव गायकवाड,‎ संगीता सोनकांबळे, बलभीम‎ गायकवाड यांनी परिश्रम घेतले.‎ अविनाश भालेराव यांनी‎ सूत्रसंचालन केले तर तालुकाध्यक्ष‎ संतोष सुरवसे यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...