आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची जल्लोषात मिरवणूक ; पारंपरिक सवाद्य मिरवणूक शांततेत पार पडली, मान्यवरांचा सहभाग आणि मार्गदर्शन

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती उत्साहात पार पडली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीमार्फत भव्य पारंपरिक सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर पाटील यांच्या हस्ते या पारंपरिक सवाद्य मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, ताजमहाल टाॅकीज रोड, काळा मारुती चौक, पोस्ट ऑफिस रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा या मिरवणुकीचा मार्ग होता. तत्पूर्वी आमदार राणाजगजितसिंह पाटील व सुधीर पाटील यांच्या हस्ते अहिल्यादेवींचे पूजन करण्यात आले. या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जि. प. सदस्य भारत डोलारे, नगराध्यक्ष दत्ता बंडगर, अखिल भारतीय खोखो संघटनेचे सचिव प्रा.डॉ. चंद्रजित जाधव, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, प्रा. सोमनाथ लांडगे, प्रा. मनोज डोलारे, प्रा. बालाजी काकडे, प्रा. डॉ. कपिल सोनटक्के, प्रा. शिवाजी गाढवे, दिनेश बंडगर, इंद्रजित देवकते, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे, गणेश एडके, मुकुंद घुले, श्रीकांत तेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मिरवणुकीला सर्व समाज बांधवांची गर्दी होऊनही मिरवणूक पार पडली. मिरवणूक यशस्वी होण्यासाठी नितीन डुकरे, संदीप वाघमोडे, अशोक गाडेकर, देवा काकडे, किशोर डुकरे, गणेश सोनटक्के, समितीचे सुरेश शिंदे यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले. नवजात कन्यारत्नांचे स्वागत जयंतीनिमित्त उस्मानाबाद येथील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालय येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीकडून ३१ मे रोजी जन्मलेल्या १० कन्यारत्नांचे स्वागत करण्यात आले. या वेळी नवजात कन्यारत्नांना प्रत्येकी दोन ड्रेस व मातांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या नावाने बँकेत ठेवही ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय सोनटक्के होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आयशा पठाण, अॅड. विद्या वाघमारे, रिबेका भंडारे, मानसी डोलारे, सोनाली काकडे, उषा लांडगे, राजनंदा वाघमोडे, दिपाली डुकरे, संगीता डुकरे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे प्रा. मनोज डोलारे, प्रा. सोमनाथ लांडगे, प्रा. बालाजी काकडे, संदीप वाघमोडे, नवनाथ काकडे, गणेश एडके, मोहन रत्ने, समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे यांनी परिश्रम घेतले. या वेळी कन्यारत्नांच्या पालकांसमवेत शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयातील कल्पना भाटे, सुनिता भालेराव, जाकीरा शेतसंधी, शोभामाळी, रशीद काझी, गिरिजा परसे, सोनटक्के मॅडम आदी स्टाफ उपस्थित होता. लोहारा येथे जयंती लोहारा शहरात जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन मंगळवारी (दि. ३१) जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नगरपंचायत कार्यालयात प्रतिमेचे पूजन उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील डॉ. श्रीगिरे हॉस्पिटल येथे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्त संकलन उस्मानाबाद येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले. सायंकाळी जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या कार्यक्रमास माजी सरपंच नागणा वकील, पं. स. माजी सदस्य चंद्रकांत पाटील, माजी सरपंच शंकर जट्टे, शिवसेना ज्येष्ठ नेते अभिमान खराडे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, नगरसेवक अमिन सुंबेकर, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाशीत जयंती उत्साहात वाशीमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मंगळवारी (दि. ३१) उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मान्यवरांच्या हस्ते सकाळी १० वाजता प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी तहसीलदार नरसिंग जाधव, नगराध्यक्षा विजयाबाई गायकवाड, उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, शिवसेना नेते प्रशांत चेडे, मच्छिंद्र कवडे,माजी नगराध्यक्ष नितीन चेडे, विरोधी गटनेते नागनाथ नाईकवाडी उपस्थित होते. सतत फडकणाऱ्या झेंड्याचे अनावरण कन्हेरी रस्ता भागात असलेल्या विठ्ठल बिरुदेव देवस्थानच्या चौकामध्ये शिवसेनेचे प्रशांत चेडे यांच्या हस्ते ध्वजस्तंभावर कायम फडकत राहणाऱ्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. त्याच बरोबर सायंकाळी प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...