आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेतील केंद्राच्या हिस्साचे अनुदान मागील दहा महिन्यापासून मिळालेले नसल्यामुळे निराधार यांना राज्याकडून मिळणाऱ्या अनुदानावर आपले उदरनिर्वाह भागवण्याची वेळ आली आहे. निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व्याधीग्रस्तांना व निराधार विधवांना आर्थिक आधार मिळावा, निराधार नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी शासनाकडून निराधार नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात, दुसऱ्यांवर अवलंबून असल्याने योजनांचा लाभ देण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदतही करणे आवश्यक आहे. जेणे करून त्या पैशाचा उपयोग औषधी खरेदी करण्याबरोबरच दैनंदिन गरजांवर करता येईल.
त्यांना सन्मानाने जगता यावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन शासनाने सन १९८० पासून संजय गांधी निराधार योजना सुरू केली. त्यानंतर भूमिहीन शेतमजूर महिला, निराधार विधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी १९९१ पासून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, तर ६५ वर्षांवरील आर्थिकदृष्ट्या निराधार व्यक्तींसाठी केंद्र सरकारने २००४ मध्ये श्रावणबाळ सेवा योजना सुरू केली. या योजनेतील अनुदान बँका मार्फत वाटप करण्यात येते.
या मध्ये केंद्र व राज्य सरकार मिळून अनुदान देते. त्यामुळे निराधारांना आधार मिळत आहे.याबाबत कळंबचे नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे म्हणाले की, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, व इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेतील राज्याच्या हिस्साचे अनुदान वाटप करण्यात आले आहे, केंद्राच्या हिस्साचे अनुदान आल्यावर तात्काळ वाटप करण्यात येईल. वृद्ध आणि निराधार अनेक आहेत. त्यांच्या सर्व आशा केंद्र सरकारच्या हिश्शावर अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
राज्याच्या अनुदानावरच सध्या उदरनिर्वाह चालू कळंब तालुक्यात श्रावणबाळ राज्य निवृत्तिवेतन योजनेत ५८६४ लाभार्थी, संजय गांधी निराधार योजना ४५११ लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना ७४८५ लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना ४१ लाभार्थी आहेत.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेत राज्य सरकार कडून ८०० रुपये व केंद्र सरकार कडुन २०० रुपये असे एक हजार रुपये देण्यात येते, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना मध्ये सरकार कडून ७०० रुपये व केंद्र सरकार कडून ३०० रुपये असे एक हजार रुपये दिले जातात.इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेतील केंद्राचे २०० रुपये अनुदान, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजनेतील केंद्र सरकार कडुन ३०० रुपये अनुदान मागील एप्रिल महिन्यापासून केंद्राचे अनुदान आलेले नाही. त्यामुळे या योजनेतील निराधारांना राज्याच्या अनुदानावर उदरनिर्वाह भागवावं लागत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.