आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:तुळजापुरात 3 ते 7 एप्रिल‎ दरम्यान चैत्र पौर्णिमा यात्रा‎

तुळजापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मातेची वर्षातील दुसरी सर्वात मोठी "चैत्र‎ पौर्णिमा यात्रा ३ ते ७ एप्रिल दरम्यान साजरी करण्यात येणार‎ आहे.‎ दरम्यान, कोरोना संकटानंतर भाविकांच्या वाढलेल्या‎ गर्दीच्या पार्श्वभूमीवर चैत्र पौर्णिमा यात्रेचे नियोजन‎ करण्याचे प्रशासना समोर आव्हान असणार आहे. शारदीय‎ नवरात्रोत्सवानंतर सर्वात मोठी यात्रा म्हणून चैत्र पौर्णिमा‎ यात्रेकडे पाहिले जाते. उन्हाळ्याची सुटी तसेच शेतीची‎ बहुतांश कामे आटोपली असल्याने चैत्र पौर्णिमा यात्रेला‎ भाविकांची मोठी गर्दी असते. दरम्यान, ऐन उन्हाळ्यात‎ भाविकांना पिण्याचे पाणी पुरवण्यासह कमी कालावधीत‎ सुलभ दर्शन उपलब्ध करण्याचे प्रशासनासमोर आव्हान‎ असणार आहे.

चैत्र पौर्णिमा यात्रेच्या नियोजनासाठी मंदिर संस्थानसह‎ नगरपालिका, पोलिस, राज्य परिवहन‎ महामंडळ, आरोग्य विभाग,‎ महावितरण आदी विभागांना‎ उपाययोजना कराव्या लागणार आहेत.‎ तुळजाभवानी मातेची चैत्र पौर्णिमा ५‎ एप्रिल रोजी साजरी करण्यात येणार‎ असून रात्री पौर्णिमेनिमित्त छबिना‎ मिरवणूक काढण्यात येणार आहे.‎ छबिना मिरवणुकीनंतर महंतांच्या‎ जोगव्याने पौर्णिमेची सांगता होईल.‎ चैत्र पौर्णिमा यात्रेला लाखोंच्या संख्येने‎ भाविकांची उपस्थिती असते.‎ भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी‎ प्रशासनाला कसरत करावी लागते.‎

बातम्या आणखी आहेत...