आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीस अडथळा:खामसवाडी गोविंदपूर रोडवर पुलाला खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता

खामसवाडी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील खामसवाडी गावालतच्या गोविंदपूर रोडवर पुलाला मधोमध खड्डा पडल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे.सध्या गावात विविध साखर कारखान्याचे ऊसतोडणी चालू आहे. ऊस वाहतूक करणारे वाहन याच मार्गावरून वाहतूक करते.

तसेच खामसवाडी येथील सिध्दीविनायक ग्रीनटेक ऊस कारखाना याच मार्गावर असून त्यांची यंत्रसामग्री याच मार्गावरून जाते. अचानक पुलात मधोमध खड्डा पडल्याने अडथळा निर्माण होत आहे. तरी संबधित विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ दुरुस्ती करुन रोड सुरळीत करु द्यावा, अशी मागणी वाहनचालकातून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...