आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील जिल्हा परिषद गट असलेल्या कदेर गावात विवेकानंद चौधरी आणि त्यांचे सहकारी यांनी मिळून ग्रुप ७ (सात) च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सकारात्मक हस्तक्षेप करत गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी धडपड करीत आहेत. कदेर येथील सात युवकांनी एकत्रित येऊन स्मशानभूमी सात मित्राची, सात दानशुराची, असे ग्रुपचे नाव ग्रुप सात म्हणून ठेवत गावातील स्मशानभूमीचे रुपडेच पालटून टाकले आहे. ग्रुप सातच्या युवकांनी गावातील नागरिकांसमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला. गावातील स्मशानभूमीची झालेली दुरवस्था पाहून युवकांनी सुरुवातीला समशनभूमीची स्वच्छता करून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले. संवर्धन करत ती झाडे जपली. त्यानंतरच्या कामाला गावातील लोकांनी मदतीचा हात पुढे करत सिमेंट बेंच ठेवण्यासाठी लोकवर्गणी दिली. त्याबरोबरच स्मशानभूमीच्या कठड्याला रंगरंगोटी करण्यात आली. या ग्रुप सातचे अध्यक्ष ओमराजे माने, सचिव राहुल मानेगोपाळे, उपाध्यक्ष बसवराज ढोबळे, गणेश गायकवाड, सिद्धार्थ माने, अनिकेत औरादे, प्रशांत चौधरी, सूरज पौळ, गौरव चौधरी, धीरज पौळ, प्रशांत औरादे, विवेकानंद चौधरी, गणेश चौधरी आदी सदस्य युवकांनी पुढाकार घेत विकासकाम सुरू केले आहे. स्मशानभूमी म्हटली की, डोळ्यापुढे जे गैरसोयीचे चित्र येते ते या युवकाच्या ग्रुपने पालटले आहे. कधीही मेहनतीचं काम न केलेल्या मित्रांनी हातात कुऱ्हाड विळा, फावड घेवून श्रमदान करून गावकऱ्यांच्या सहकार्यातून स्मशानभूमीचा विकास केला. कडुलिंब, पिंपळ, वड, बांबू यासह विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. सोबतच फुलांची अतिशय मोहक झाडे दुतर्फा लावण्यात आले आहेत. झाडे जनावरांनी खाऊ नये यासाठी त्या भोवती लोखंडी संरक्षक जाळे व वाळून जाऊ नये, यासाठी नियमित पाणी देतात. कदेरसह अनेक गावांमध्ये लिंगायत समाजास स्वतंत्र दफनभूमी नसल्यामुळे मृतदेह दफन करण्याची प्रथा असतानाही दहन करण्याची वेळ येते. त्यामुळे लिंगायत समाजाला स्वतंत्र दफनभूमी मिळावी यासाठी हा समूह प्रयत्न करतो आहे. फाउंडेशनचे संस्थापक ॲड. शीतल चव्हाण, ॲड. ख्वाजा शेख, करीम शेख यासह सदस्यांनी कदेर गावाला भेट दिली आणि ग्रुप सात यांच्या सत्कार्यात आपणही सोबत राहून हे कार्य व्यापक होण्यासाठी त्यांना बळ देण्याचा निर्धार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.