आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:डिकसळ, खडकी, करंजकल्ला, लाेहटा पूर्व, कोथळा येथे सत्ता परिवर्तन

डिकसळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील सर्वाधिक लक्ष लागलेल्या डिकसळ , खडकी, करंजकल्ला , लोहटा पूर्व , लोहटा पश्चिम ,कोथळा, हिंगणगाव या गावातील ग्रामपंचायतचे नवे कारभारी कोण याचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून डिकसळ, खडकी , करंजकल्ला, लोहटा पूर्व , कोथळा , गावात सत्तापरिवर्तन झाले तर पश्चिम लोहटा व हिंगणगावमध्ये सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या चाव्या आपल्याकडेच ठेवल्या आहेत.

यामध्ये डिकसळ गावात महाविकास आघाडीच्या सौ. पुष्पा नानासाहेब धाकतोडे या विजयी झाल्या तर सदस्यांच्या १७ पैकी १३ जागा जिंकत सत्ता परिवर्तन घडवून आणले तर भाजपा व शिंदे गटाला चार जागा मिळाल्या. खडकी गावात महाविकास आघाडीच्या सौ अस्मिता बालाजी राखुंडे यांनी विजय आपलीकडे खेचून एकूण ७ पैकी चार जागा जिंकल्या तर शिवसेनेने तीन जागा राखल्या. लोहटा पश्चिम गावात सत्ताधारी भाजपाने पुन्हा एकदा गावात सत्ता कायम राखत सौ, स्वाती संजय आडसूळ यांना गुलाल लावला, सोबत सात पैकी सहा सदस्यही निवडून आणले.

करंजकल्ला गावात महाविकास आघाडीने भाजप प्रणित सत्ताधारी पॅनेलला जोरदार धक्का देत सत्ता परिवर्तन घडवत सरपंच सौ. वंदना जालिंदर हिंगमिरे विजययि केले व नऊ पैकी सहा सदस्यांना गुलाल लावला . लोहटा पूर्व गावातहि सत्ताधारी भाजपा प्रणित पॅनेलला शिवसेनेने धूळ चारून सत्ता परिवर्तन घडवून आणत ऋषिकेश भिसे या तरुण नेतृत्वाला संधी दिली आहे. सोबत सहा उमेदवारही निवडून आणले. कोथळा गावात शिवसेनेला पराभवाचे आसमान दाखवत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे.

ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या तालुक्यातील या उमेदवारांनी मिळवला विजय
१-डिकसळ - सरपंच सौ. पुष्पा नानासाहेब धाकतोडे (२४४९) तर सदस्य प्रदीप श्रावण गायकवाड, जनक किसनराव अंबिरकर, सूर्यकांत उत्तम कदम, मनीषा संजय अंबिरकर, अंजली महादेव अंबिरकर, हरिचंद गुणवंत कुंभार ,सचिन चंद्रकांत काळे, संगीता लक्ष्मीकांत मुंडे, मणियार मुबीन बशीर, इम्रान मुल्ला, सय्यद इर्शाद रफिक, जाधव जनक गोरोबा, शोभा प्रकाश मस्के, स्वाती गणेश काळे, वाघमारे मंगल अंकुश, पठाण फातिमा अफसर , बोराडे शामल अनंत

२-खडकी- सरपंच सौ. अस्मिता बालाजी राखुंडे,( ३५८) तर सदस्य भंडारे बाळासाहेब, गिरी सखुबाई, राखुंडे सुखदेव, अंजली राखुंडे, आण्णा राखुंडे , उषा तांबारे, सुलन शिंदे ,

३-लोहटा पश्चिम - सरपंच सौ. स्वाती संजय आडसूळ (६३३) तर सदस्य रामेश्वर आडसूळ, सिंधू पाटुळे, संजय आडसूळ , सुमन यादव ,रविकांत पवार, सावित्रीबाई सावंत , गयाबाई शिंदे,

४-करंजकल्ला - सरपंच सौ. वंदना जालिंदर हिंगमिरे (१२६६ ) तर सदस्य विनोद पवार, अर्चना झोंबाडे, वंदना हिंगमिरे ,विलास पवार, विशाल पवार, रेणुका पवार, नंदकुमार पवार, नंदा कवडे, लता पवार,

५-लोहटा पूर्व - सरपंच ऋषिकेश दिनकर भिसे ( ७६७ ) तर सदस्य मृणाल ढगे , सुप्रिया बोरकर, सिद्धार्थ टोपे, संतोष चव्हाण, ज्योती घुले, अशोक वायकर , संतोष टोणगे अर्जनाबी मोगल , संतोष मगर,कांचनमाला ढगे, मोहर भोगले

६-कोथळा - सरपंच रामहरी गणपती शिंदे ( ९५९ ) तर सदस्य उध्द्वव बोबडे, चंद्रकांत हुंबे, पवित्राबाई पवार, हरिदास डोंगरे ,सुबाबाई ओव्हाळ, सुरेखा डोंगरे ,गोविंद शिंदे, राधाबाई जाधव, कुसुम डोंगरे

७-हिंगणगाव - सरपंच सौ. सुरेखा लोंढे ( ४९१ ) तर सदस्य माणिक ढगे ,मनीषा अभंग ,नामदेव माळकर, सुरेखा इटेकर , महारुद्र गवळी, भाग्यश्री आवाड , आशा हातमोडे

बातम्या आणखी आहेत...