आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:नैसर्गिक आपत्तीमुळे मदत मिळण्यासाठी भूमिहीन, बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी नियमात बदल करा; खासदार ओम राजेनिंबाळकर यांची मागणी

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचे पूरस्थिती निर्माण होऊन प्रचंड प्रमाणात नुकसान होते. पूर आल्यामुळे शेतीतील सुपीक माती वाहून जाऊन जमिनी खरडून जातात. परिणामी अशा जमिनी लागवडीयोग्य होण्यासाठी बराच कालावधी जातो. जमिनी खरवडून गेल्यामुळे बहुभूधारक शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. तसेच भूमिहीन शेतमजुरांची जनावरे नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू पावल्यास काही कठीण व जाचक अटी व शर्तींमुळे केंद्र सरकारच्या मदतीपासून वंचित राहतात. अशा शेतकऱ्यांना व शेतमजुरांना एनडीआरएफ ची मदत मिळवण्यासाठी जाचक अटी, नियम आणि निकष बदलण्याची मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेत शून्य प्रहरात केली. ते म्हणाले, दोन वर्ष महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतीजमीनी, पिके, जनावरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एनडीआरएफमधून मिळणारी मदत ही अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळते. मात्र या मदतीपासून शेतमजूर वर्ग, शेती नसणारा पशुपालन करणारा वर्ग हा पूर्णपणे वंचित आहे. त्यामुळे नुकसान झालेला एकही माणूस वंचित राहणार नाही,या दृष्टिकोनातून सर्वसमावेशक पद्धतीने राष्ट्रीय आपत्ती निवारण यंत्रणेचे अटी, निकष असावेत. राष्ट्रीय आपत्ती निवारणमधून मदत केंद्र सरकार करत असते. तसेच राज्य सरकार ही एसडीआरएफ मधून मदत करत असते. वास्तविक केंद्र सरकारचे मदतीचे निकष हे नुकसानग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवणारे असून हे निकष बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे एनडीआरएफ चे जाचक अटी,नियम बदलून शिथिलता केल्यास नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...