आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधामण जातीच्या सापाला मारुन त्याचे तुकडे करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करत क्रुर कृत्याची हद्द पार करणाऱ्या ६ माथेफिरूंविरूध्द अखेर वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. मुलांच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर या प्रकाराविरूध्द प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता.हा प्रकार तालुक्यातील बेटजवळगा शिवारातील घडल्याचे तपासात समोर आले आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, २४ मे रोजी बेटजवळगा शिवारात सहा जण मित्र सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास फिरत गेल्यानंतर त्यांना भारतीय धामण प्रजातीचा साप दिसला. त्या सापास काठीने ठार मारुन कत्तीच्या सहाय्याने त्याचे सहा तुकडे केले. हे तुकडे करत असतानाचा व्हिडीओ मुलांनी तयार केला. त्यातील एकाने त्याच दिवशी दुपारी हा व्हिडीओ आपल्या वॉट्सअप स्टेटसला ठेवून सोशल मिडीयावर प्रसारित केला. हा व्हिडीओ सर्वत्र प्रसारित झाल्याची माहिती वन विभागाला कळताच व्हिडीओचा वन परिमंडळ अधिकारी एम. बी. गुट्टे यांनी तपास केला.
सदर गुन्ह्याचा तपास करुन बुधवारी (दि.३१) श्रीकांत जयानंद जाधव (२१,रा. येणेगुर ता.उमरगा) अशिष संजय माने (२१, माडज ता. उमरगा), महादेव दिगंबर कांबळे (१९, रा. नाईचाकूर, ता.उमरगा) यांच्यासह अन्य तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९७२ चे कलम ९ व ५१ अन्वये प्रथम वनगुन्हा नोंदविण्यात आला. सहाय्यक वनसंरक्षक व वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती व्ही.बी.तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक टी.ए.डिगोळे, एन.बी. कोकाटे व जी. एल. दांडगे यांनी तपास करुन आरोपींना अटक केली आहे. त्यांना वन विभागाकडून कोठडी मिळाल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.