आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:श्री क्षेत्र बिरुदेव मंदिरात चरित्रवाचन, पारायण; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिडानसिद्ध मंदिराचा कलशारोहण सोहळा

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री क्षेत्र बिरूदेव मंदिर संस्थानच्या वतीने मंगळवारपासून (दि. ५) श्री ज्ञानेश्वरी पारायण व बिरूदेव चरित्र वाचन सोहळा होत असून सप्ताहात दररोज विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उमरगा-लातूर मार्गावरील श्री क्षेत्र बिरूदेव मंदिरात गेल्या चार वर्षांपासून ज्ञानेश्वरी पारायण व बिरूदेव चरित्र वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा पाचव्या वर्षी सप्ताह सोहळ्यात दररोज पहाटे काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, श्री बिरूदेव चरित्र कथा, हरिपाठ, कीर्तन, हरीजागर आदींसह धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. दरम्यान गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी (दि. २) सकाळी ११ वाजता शिडानसिद्ध मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे. या सप्ताहात मंगळवारपासून दररोज दुपारी साडेतीन ते पाच हभप ज्ञानेश्वर महाराज नाथ मंदीर यांचे बिरूदेव कथा चरित्र सेवा होणार असून दररोज रात्री ९ ते ११ हभप ज्ञानोबा महाराज केंद्रे लातूर, बुधवारी (दि.६) जनार्धन भोसले महाराज, गुरुवारी (दि. ७) प्रशांत महाराज घोडके, शुक्रवारी (दि. ८) शरद महाराज बिराजदार, शनिवारी (दि. ९) एकनाथ हंडे महाराज पंढरपूर यांची कीर्तन सेवा होणार आहे. रविवारी (दि. १०) हभप ज्ञानेश्वर महाराज माकणी यांची सकाळी ११ वाजता रामनवमी गुलालाचे कीर्तन होणार आहे. रात्री हभप आशाताई राऊत लातूर यांची कीर्तन सेवा होणार आहे. सोमवारी (दि.११) हभप ज्ञानेश्वर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. डॉ. शुभांगी घोडके, डॉ. अनिकेत बनसोडे, महादेवी घोडके, माधुरी घोडके गुणवंतांचा सत्कार, त्यानंतर महाप्रसादाने सांगता होणार आहे.

भाविकांना आवाहन
सप्ताहात दररोज नामवंत गायक, मृदंगवादक यांचे संगीत भजन, परिसरातील भजनी मंडळ उपस्थित राहून सेवा देणार आहेत. उमरगासह परिसरातील भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बिरूदेव देवस्थान पुजारी, जय मल्हार युवा सेना संघटना आणि ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...