आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अ’ मानांकन प्राप्त:छत्रपती शिवाजी महाविद्यालयास नॅककडून ‘अ’ मानांकन प्राप्त

उमरगा2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत शिक्षण संस्था संचलित शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास बेंगलोर त्रिसदस्यीय तपासणी समितीने मंगळवारी (२१) राष्ट्रीय मूल्यांकन नॅकद्वारा अ मानांकन देऊन मूल्यांकन केले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे हे तिसरे मूल्यांकन चक्र होते. दर पाच वर्षांनी नॅक बेंगलोर द्वारे महाविद्यालयांचे मूल्यांकन केले जाते.

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या पहिल्या दोन्ही मूल्यांकनात बी ग्रेड होता. तिसऱ्या मूल्यांकन प्रक्रिये मध्ये लखनऊ, पोर्ट ब्लेयर अंदमान-निकोबार आणि गोवा येथील तज्ज्ञ समितीने भेट देऊन महाविद्यालयाच्या विविध विभागातील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. महाविद्यालयाने भविष्यात स्वायत्तता घेऊन जिल्ह्यामधील या परिसरातील उच्चशिक्षणाच्या गुणवत्ता वाढीस पुढाकार घ्यावा. अशी शिफारस समिती प्रमुखांनी केली आहे. भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष अश्लेष मोरे, सरचिटणीस जनार्दन साठे, चिटणीस पदमाकर हराळकर, सहचिटणीस डॉ सुभाष वाघमोडे, सर्व संचालक, प्राचार्य डॉ घनश्याम जाधव यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...