आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा:शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करु, येत्या दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार निर्णय; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन

उस्मानाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आकडे लावण्यासाठी मी आलेलो नाही. जे करु तुमच्या सुखासाठी करु - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील काटगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा. शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल अशा मदतीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करु असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यासोबतच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मंत्रीमंडळ बैठक घेऊन मदतीचा निर्णय घेतला घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशीही संवाद साधला आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'महाराष्ट्र माझ्यासाठी नवीन नाही. मी यापूर्वीही फिरलो आहे तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो. तेव्हाही तुमच्या वेदना, व्यथांना आवाज देण्याचे काम करत होतो. माझे कतृत्त्व शून्य असले तरीही तुमच्यामुळे मुख्यमंत्री झालो आहे. आजची परिस्थिती भयानक आहे. यंदाच्या वर्षाची सुरुवातच भयानक झाली आहे. यात निसर्ग वादळ आणि पावसाने तडाखा दिला आहे.'

पुढच्या दोन दिवसात घेऊ निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले की, 'शेतकऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मंत्रीमंडळ बैठक घेतली जाईल. जवळपास 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. लवकरात लवकर आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच आकडे लावण्यासाठी मी आलेलो नाही. जे करु तुमच्या सुखासाठी करु. धीर सोडू नका, खचून जाऊ नका' असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...