आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल आनंद मेळावा‎:जिल्हा परिषद उर्दू शाळा तेर येथे‎ विद्यार्थ्याचा बाल आनंद मेळावा‎

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ तालुक्यातील तेर येथील जिल्हा‎ परिषद उर्दू शाळेत बाल आनंद‎ मेळावा (खरी कमाई) उपक्रम‎ शनिवार दि. ४ फेब्रु. रोजी घेण्यात‎ आला. सकाळी जुनेद मोमिन यांच्या‎ हस्ते फीत कापून विद्यार्थ्यांनी‎ थाटलेल्या बाजाराचे उद्घाटन‎ करण्यात आले. यावेळी शालेय‎ व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख‎ मोहियोद्दीन , उपाध्यक्ष काझी‎ मुख्तार अहेमद , सदस्य शेख‎ मुजीब , मुलानी इर्शाद, व सर्व‎ सदस्य गण उपस्थित होते.

यावेळी‎ पाक-कला प्रदर्शनात सहभागी‎ विद्यार्थ्यांच्या निरिक्षणासाठी‎ निरिक्षक म्हणून सय्यद शबनम‎ मॅडम गुलशन ए अत्फाल उर्दू शाळा‎ उस्मानाबाद , पटेल अजहर सर जि.‎ प. प्रशाला बेंबळी , इनामदार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मुफस्सिल सर पंडित जवाहरलाल‎ नेहरू हायस्कूल भूम , श्रीमती‎ शाफिया जि. प. उर्दू शाळा अंबेहोळ‎ हे पाहुणे उपस्थित होते.

सर्व‎ मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात‎ उद्घाटन समारंभ झाला. या‎ कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक शहा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तय्यबअली आणि सर्व शिक्षकांनी‎ परिश्रम घेतले.शेवटी सर्व‎ उपस्थितांचे आभार प्रदर्शन करून‎ मेळाव्याची सांगता झाली. मुलांमध्ये‎ शालेय जीवनात व्यवहार ज्ञान‎ निर्माण व्हावे यासाठी अशा‎ उपक्रमांचे आयोजन होत आहे.

बातम्या आणखी आहेत...