आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील हिंगणगाव येमाईवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना आर्थिक व व्यवहारज्ञान मिळावे, हा यामागे उद्देश होता. या मेळाव्याचे उद्घाटन प्रभारी गटशिक्षणाधिकारी सूर्यभान हाके, विस्तार अधिकारी अशोक खुळे, सतीश संगमनेरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच संतोष गोरे, उपसरपंच महेश कदम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विद्याधर कुरुंद, उपाध्यक्ष फकिर मोरे, केंद्रप्रमुख नागनाथ गटकळ, साने गुरूजी शिक्षक सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर देवराम, जगन्नाथ साठे, नितीन गायकवाड, सुवर्णा खटाळ, राहुल काळे, महेश ठोंगे, सुधीर वाघमारे, विश्वास वाघमारे, जयंत जोशी, साहेबलाल पठाण, प्रिती वीर, शिक्षणप्रेमी आबा गुरव, सदस्य गणेश मारकड, पंडित आबा गोरे, राहुल कुरुंद आदींसह सर्व सदस्य, ग्रामस्थ, पालक, माता भगिनी उपस्थित होत्या. यावेळी सर्वांनी छोट्या बालगोपाळांच्या बाजारातील खरेदीचा आनंद लुटला. आनंद बाजार यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्यध्यापिका वर्षाराणी दसंगे, शिक्षिका कविता कांबळे, अंगणवाडी शिक्षिका सुजाता करूंद, अर्चना शिंदे, सोनाली कुरुंद आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.