आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवा वर्गामध्ये व्यासनधीनता वाढल्यामुळे एक तरुण पिढी पूर्णपणे वाया जाण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी पालकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष देऊन त्यांना चांगले संस्कार द्यावे जेणेकरून एक आदर्श व सुसंस्कृत पिढी तयार होईल तसेच मुलांनी देखील व्यसनापासुन दुर राहून आपल्या आई वडिलांची चांगल्या प्रकारे सांभाळ करून त्यांची सेवा करावी असे आळंदी येथील बालकीर्तनकार ह. भ.प. माऊली महाराज जाहुरकर यांनी नळदुर्ग येथे शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीने शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तन कार्यक्रमात कीर्तन करतांना म्हटले. नळदुर्ग येथे शिव-बसव-राणा जन्मोत्सव समितीच्या वतीने १० ते १३ मार्च या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज व वीर महाराणाप्रताप या तीन महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. ११ मार्च रोजी आळंदी येथील बालकीर्तनकार ह.भ. प.माऊली महाराज जाहुरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कीर्तनापुर्वी लहान मुला-मुलींच्या नृत्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
त्यानंतर शिव--बसव--राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने शहरातील नगरपालिका, शाळा व आरोग्य विभागातील ९० स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव केला.यानंतर रात्री आठ वाजता बालकीर्तनकार ह.भ. प.माऊली महाराज जाहुरकर यांचे कीर्तन झाले. प्रारंभी शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष विजयसिंह ठाकुर, उपाध्यक्ष भिमाशंकर बताले, राकेश गायकवाड, सचिव अक्षय भोई, सहसचिव सागर कलशेट्टी, कोषाध्यक्ष राहुल दासकर, सांस्कृतिक प्रमुख प्रमोद जाधव यांच्यासह माजी नगरसेवक नितीन कासार, अमृत पुदाले,संतोष पुदाले,सरदारसिंग ठाकुर, विलास येडगे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांनी बालकीर्तनकार माऊली महाराज जाहुरकर यांचा भव्य सत्कार केला यावेळी महाराजांना नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्याची प्रतीमा भेट दिली. जाहुरकर यांची जिल्हयात काही प्रवचने झाली आहेत.
नळदुर्गमध्ये तीन महापुरूषांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
अवघ्या ९ वर्षाच्या या बालकीर्तनकाराने समाजाचे डोळे उघडणारे कीर्तन केले. त्यांनी आपल्या कीर्तनातून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.आजच्या युवकांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन करण्याबरोबरच बालकीर्तनकार माऊली महाराजानी सासू आणि सुनेचे नाते कसे असावे याबद्दलही मार्गदर्शन केले. त्याचबरोबर भावी पिढी सुसंकृत निर्माण व्हावी यासाठी आता महिलांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही माऊली महाराज यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.