आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नालीवरील स्लॅब कामास सुरूवात:दर्जेदार काम करण्याची नागरिकांची मागणी

उस्मानाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पोलिस मुख्यालय ते कोहिनूर हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नालीचा स्लॅबच्या कामाला सुरूवात झाली आहे. यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह नागरिकांची सोय होणार असून धोका टळणार आहे. मात्र, करण्यात येणारे स्लॅबचे काम दर्जेदार करण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये करण्यात आलेला स्लॅबला आठ दिवसांत भग्दाड पडले होते.

उस्मानाबाद शहरातील पाटबंधारे विभाग, आनंदनगर, समतानगरमध्ये जाण्यासाठी औरंगाबाद-उस्मानाबाद बसस्थानक रस्त्याहून पोलिस मुख्यालयापासून आत जावे लागते. मात्र, मुख्य रस्त्याहून आत जाणाऱ्या नालीवरील स्लॅबला भग्दाड पडल्याने वाहतूक खोळंबली होती. यामुळे दैनिक दिव्य मराठीने याबाबत वृत्त प्रकाशीत केले होते. याची दखल घेऊन पालिकेने नालीवरील स्लॅबचे काम सुरू केले असून नागरिकांची गैरसोय टळणार आहे. नालीवरील स्लॅबवरील भग्दाड असल्याने रात्री वेगाने आलेल्या वाहनाचे टर्न घेताना चाक अडकत होते. यामुळे वाहन चालकांचा मनस्ताप वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...