आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईट या ठिकाणी पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या नोंदीसाठी शासनाकडून महावेद या कंपनीकडूनन ईटमध्ये तलाठी कार्यालयाशेजारी पर्जन्य मापक यंत्र गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी बसविण्यात आले आहे. मात्र यावषीॅ या पर्जन्यमापक यंत्रामधून चुकीच्या पावसाच्या नोंदी गेल्याचे बोलले जात आहे. जास्त पाऊस असून यातून कमी नोंद झाल्याचे बोलले जात आहे.या चुकीच्या नोंदीमुळे ईट महसूल अंतर्गत शेतकऱ्यांना खरिप हंगामातील झालेल्या नुकसानीस वंचित राहावे लागले आहे.यामुळे येथील संतप्त शेतकऱ्यांनी दि १२ रोजी या पर्जन्य मापक यंत्र व मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयास गांधीगिरीने आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
ईट येथील पर्जन्यमापक यंत्र मागील अनेक दिवसापासून नादुरुस्त असल्याने कोसळणाऱ्या पावसाची अचूक नोंद होत नाही. यावर्षीच्या पावसाळ्यात तीन ते चार वेळा ईट मंडळात ६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडलेला असताना ही उंटावरून शेळ्या हाकणारी संपूर्ण यंत्रणा अंदाजे काहीही आकडे दाखवून ईट मंडळातील १२ ते १३ हजार शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेली आहे. महसूल विभाग व पर्जन्यमापक यंत्राची देखरेख करणाऱ्या कंपनीने या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी सरपंच आसलकर,शेतकरी संघटनेचे अनंत डोके,शिवसेनेचे केशव चव्हाण ,शेतकरी संदिपान कोकाटे,समाधान हाडुळे,रामराजे देशमुख,संपत देशमुख, प्रसाद सातपुते, अमित देशमुख आदीसह शेतकरी उपस्थित होते.
पावसाचे चुकीचे आकडे दाखवल्यामुळे ईट मंडळातील १९ गावातील शेतकरी या वर्षीच्या अनुदानापासून वंचित राहिलेला आहे आणि त्याचाच परिणाम यावर्षीचा सोयाबीन पीक विमा न मिळण्यास झाला आहे. अनेक वेळा महसूल अधिकाऱ्यांना नादुरुस्त यंत्रणेची माहिती देऊन ही गेंड्याची कातडी पांघरलेला महसूल विभाग जागा व्हावा म्हणून आज परिसरातील शेतकऱ्यांनी त्या पर्जन्यमापक यंत्राला हार घालून गांधीगिरी आंदोलनद्वारे निषेध व्यक्त केला. ईट परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्र जमून वाजत गाजत पण कसल्याही घोषणा न देता मिरवणूक काढून पर्जन्यमापक यंत्राला व बंद असलेल्या मंडळ अधिकारी कार्यालयाला पुष्पहार घालून निषेध व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.