आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:नागरिकांनो, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभाग नोंदवा, नगरपरिषद देणार झेंडा

मुरूम8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येणार आहे. याबाबत येथील पालिका सभागृहात शुक्रवारी (दि.५) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ व सपोनि डॉ. रंगनाथ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत उपक्रमाबाबत जनजागृती करण्यात आली.

मुरूम शहरात नगरपरिषदेकडून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभाग नोंदवावा. नागरिकांनी नगरपरिषदकडे तिरंगा ध्वजाची मागणी नोंद केल्यास झेंडा पुरवण्यात येणार आहे. नागरिकांनी तिरंगा झेंडा संहितेचे पालन करत कुठल्याही परिस्थितीत झेंड्याचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. या कालावधीत शाळा, महाविद्यालये, नगरपालिका, स्वयं सहायता समूह यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन देशाप्रती व तिरंगा झेंड्याप्रती आपला स्वाभिमान जागृत करण्याचे आवाहन मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी केले. याप्रसंगी शहरातील राजकीय पक्षांचे नेते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, माजी सैनिक तसेच पत्रकार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...