आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये लोहारा शहरातील नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन लोहारा नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. याअंतर्गत नगरपंचायतीच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात येणार आहे.
‘हर घर तिरंगा’ अभियान कालावधीत सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवायचा आहे. नागरिकांनी अभियानात सहभाग नोंदवावा, यासाठी नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, सर्व समितीचे सभापती, नगरसेवकांनी आवाहन केले आहे. राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखून झेंडा उभारण्याची दक्षता घ्यावी. झेंडा उभारताना ध्वज संहितेचे पालन करत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी केले. या अभियानात नगरपंचायतीचे आजी-माजी सदस्य, शिक्षक, महिला बचत गटाच्या महिला, सर्व बँकांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, मित्र मंडळ, सार्वजनिक उत्सव मंडळ, तरुण मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.