आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने भारतातील प्रत्येक नागरिकाला तिरंगा ध्वज फडकविण्याचा अधिकार दिला आहे, असे प्रतिपादन तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी केले. शहरात हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत रा. गे. शिंदे महाविद्यालयाच्या वतीने रॅली काढण्यात आली, यावेळी ते बोलत होते. गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत व्याख्यान घेण्यात आले. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. सुनील जाधव, मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली, प्रा. डॉ शहाजी चंदनशिवे, मंडलाधिकारी पवार, प्रकल्प अधिकारी के. बी. शिंदे, प्रा. डॉ. विशाल जाधव, प्रा. दत्तात्रय मांगले आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनी प्रज्ञा बनसोडे हिने देशभक्तीपर गीत सादर केले.
तहसीलदार देवणीकर म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, यासाठी दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ध्वज आपल्या घरावर लावणे बंधनकारक असेल व १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर तो सन्मानाने काढून जपून ठेवावा. रॅलीचे उद्घाटन तहसीलदार रेणुकादास देवणीकर, मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली, प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते झाले. आभार डॉ सचिन चव्हाण यांनी मानले. यशस्वितेसाठी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभने, डॉ सचिन चव्हाण, महेश कसबे, महेश एकसिंगे जलाल मुजावर, अमोल अंगरके, बापू जाधव, दत्ता आतकर, वसंत राऊत, अरुण माने आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.