आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कर्णकर्कश आवाजाच्या दुचाकींमुळे नागरिक त्रस्त ; गाडया चालविणाऱ्या युवकांवर कारवाई कधी?

उमरगा19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात अनेक दुचाकीस्वार कर्णकर्कश आवाज आणि फॅन्सी नंबर प्लेटने जनता त्रस्त असून अशा वाहन चालकावर पोलीस प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग व अंतर्गत भागात अनेक शौकीन भरधाव मोठ्या आवाजाच्या दुकाचाकीवर फिरतात यावेळी या कर्णकर्कश आवाजाचा अनेकांना नाहक त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. सकाळी व संध्याकाळी तर अशा वाहनांची जणू स्पर्धाच दिसून येते. काही दुचाकीस्वार विशेषतः पोलीस ठाण्यासमोरून जातात त्यावेळी पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात हे विशेष. दुचाकी चालवणारे बरेच मुलं अल्पवयीन आहेत. दुचाकीस्वाराचे पालक याकडे पुत्रप्रेमापोटी दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अश्या बऱ्याच दुचाकीवर वाहन क्रमांक नाहीत. क्रमांक असेल तर फॅन्सी पाट्या लावून क्रमांक टाकले आहेत. फॅन्सी नंबरप्लेट द्वारे ‘दादा’, ‘बॉस’, ‘नाना’, ‘मामा’, ‘एसटी’, काका आदी अक्षरांचे स्वरूप दिले जाते. काही वेळा हौस तर अनेकदा दहशत निर्माण करण्याच्या हेतूने असे नंबर प्लेट बनवण्यात येतात. एखादी दुर्घटना घडल्यास या फॅन्सी नंबर प्लेटमुळे वाहनाचा क्रमांक काय आहे हेच दिसून येत नाही. शिवाय अशा दुचाकी चालकाकडे वाहन परवाना नसतात. दुचाकीचे वरती तीन-चार युवक बसून सुसाट धावताना चारचाकी वाहनास दुचाकी वाकडी करून दोन वाहनांच्या मधून वेगाने हॉर्न वाजत निघून जातात. आरटीओ विभागामार्फेत रस्ता सुरक्षा मोहिम राबविण्यात येते. मात्र अशा दुचाकी चालकां वरती वाहतूक पोलिस, संबंधित विभाग कारवाई करणार काय ? असा नागरिकांतून प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात यापूर्वी अल्पवयीन युवकांच्या दुचाकी स्टंट मुळे रस्त्यावर घसरून झालेल्या अपघात अनेकांचा मृत्यू झाला तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. मागील सहा ते सात महिन्यापूर्वी शहरात पोलीस प्रशासनाकडून दुचाकी व चालकांवर कार्यवाही होत असताना स्थानिक राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांचे मोबाईल व दूरध्वनीवर फोन येत असल्याने पोलीसांना अर्ध्यात कारवाई मोहीम गुंडाळावी लागली होती. अनेक दुचाकीस्वार हे उच्चभ्रू कुटूंबातील तर उनाडक्या करीत नेत्यांचा जय म्हणत सामान्य कुटूंबातील मुले मालक, साहेब, नेत्यांच्या जीवावर बिनधास्त फिरतात. संबंधित विभागाने कुण्याही मालक, साहेब व पुढाऱ्याच्या दबावाखाली न येता वाहन पकडल्या क्षणी गुन्हा दाखल केल्यास अशा प्रकारावर नक्कीच आळा बसेल.

अंतर्गत रस्त्यांवरूनही वेगाने गाड्या जातात सायलेन्सर काढून रस्त्यावरून बाइक चालविणे ही बाब प्रामुख्याने महामार्गावर दिसून येते. पण आता शहरात जरा थोडी वाहतूक मंदावली किंवा कॉलन्यांच्या अंतर्गत भागातूनही अशा वेगाने बाइक्स चालविणारे युवक आहेत. यांना रोखण्यासाठी कारवाईप्रमाणे परवाना देण्यापूर्वीची लेखी परीक्षा कडक करणे महत्वाचे आहे. अनेक युवक एजंटाच्या माध्यमातून परवाने मिळवितात.

बातम्या आणखी आहेत...