आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावातावरण बदल आणि हिवाळ्यात थंडी प्रत्येकाला हवीहवी वाटत असली तरी काही जणांस हवेतील गारवा वेदनादायी ठरतोय. थंडीने अनेक लोकांना सांधेदुखी आजाराचा त्रास उद्भवतो. संधिवात असलेल्या रुग्णांसाठी थंडीचा काळ अवघड असतो. अनेकांना सांधेदुखी त्रास सुरू झालाय. गुडघे व सांध्यांच्या दुखण्याने हैराण झालेले अनेक रुग्ण सध्या रुग्णालयात येत असल्याची माहिती तज्ञ डॉक्टर्स यांनी दिली आहे.
विशेषतः वातरक्त आणि आमवात यासारखे आजार आहेत त्यांना थंडीत खूपच त्रास होतो. यामुळे वेदना, सूज येणे, जळजळ अन सांधे कडक होणे अशा समस्या उद्भवतात. थंडीत सतत मांसाहार किंवा अधिकाधिक गोड पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तवात होण्याची ही शक्यता असते. युरिक अॅसिडमध्ये खर (क्रिस्टल) तयार होतात. ही खर रक्तात विशेष करून जेथे हाडांचे जॉइंट्स असतात, तेथे अडकते व वेदना सुरू होतात. अन्य अॅलर्जी आणि संक्रमणांप्रमाणेच, हिवाळ्यात संधिवात देखील वाढू शकतो.
बॅरोमेट्रिक दाबामध्ये लक्षणीय घट झाल्याने सांध्यात वेदना जाणवतात. सतत कमी तापमानामुळे सायनोव्हियल द्रवपदार्थाची जाडी देखील वाढू शकते, यामुळे सांधेदुखी वाढते . यामुळे सांधे कडक आणि वेदनांना संवेदनशील बनवते.जेव्हा दाब कमी होतो, तेव्हा ऊती फुगतात सांध्यात तणाव निर्माण होतो आणि वेदना होतात.
ज्यांच्या शरीराची जाडी जास्त आहे, त्यांना संधीवाताचा त्रास जास्त होतो. कारण अतिखाण्यामुळे तसेच मसालेदार पदार्थ्यांच्या सेवनामुळे शरीरातील चरबी वाढते आणि त्याचा परिणाम ह़दयाच्या गतीवर होतो. शिवाय थंडी सहन करण्याची प्रत्येकाची क्षमता कमी आधिक असू शकते. त्यानुसार सांधेदुखीचा त्रासही कमी आधिक होऊ शकतो.
विकसित देशांमध्ये फास्ट फूडचे परिणाम आता जगाला दिसत आहेत. कारण तेथे लठ्ठ लोकांची संख्या वाढलेली आहे. याचा परिणाम सांधदुखी वाढण्यात होतो. आपल्याही देशात मसालेदार पदार्थ खाण्याचे प्रमाण वरचेवर वाढत आहे. यामुळे लहान मुलांमध्येही चरबीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. डी जीवनसत्वाचे प्रमाण कमी असणे हेही सांधेदुखीचे प्रमुख कारण असल्याचे डॉक्टर सांगतात. अशा वेळी आपल्या शरीरात कोणत्या प्रकारचे व्हिटॅमिन कमी आहे याची तपासणी करून घेणे गरजेचे असते. माणसाचे वय, रक्तदाब ,शुगर याचाही वाईट परिणाम होतो.
कमी सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी ची पातळी कमी
या संदर्भात बोलताना डॉ.विजय बेडदुर्गे म्हणाले की, संधिवात असलेले रुग्ण महिन्याला बाह्यरुग्ण विभागात येतात. मात्र थंडी सुरू झाल्यापासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. युवकांत सांधेदुखीचे प्रमाण कमी असले तरीही काही मध्ये आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हिवाळ्यात सांधेदुखीचा धोका अधिक आहे.थंड वातावरणामुळे बोटे व पायाचे रक्ताभिसरण कमी होते.यामुळे सांधेदुखीचा त्रास होतो. हिवाळ्यात थंडीच्या दिवसात कमी सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन “डी” ची पातळी कमी होते आणि सांधे कमकुवत होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.