आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:गुंजोटीमध्ये आमदार ज्ञानराज चौगुले यांचा नागरी सत्कार

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंजोटी आणि परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली नागरी रुग्णालय याचे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुपांतर करण्यासाठी मागणी शासन दरबारी पाठपुरावा करून मंजुरी आणल्याने गुंजोटी ग्रामस्थांच्यावतीने शनिवारी (३) आमदार ज्ञानराज चौगुले यांचा भव्य नागरी सत्कार झाला.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक एम. ए. सुलतान, सरपंच सरस्वती कारे, डॉ दामोदर पतंगे, शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुहास साळुंके,गुंजोटी व्यापारी महासंघ अध्यक्ष बळवंत पाटील आदींची उपस्थिती होती.

सत्कारानंतर आधार फाऊंडेशन, भारतीय जनता पार्टी, दिव्यांग संघटना, महिला आघाडी, सुलतान शेठ मित्र मंडळ, गुंजोटी आदी मंडळाच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. यानंतर अन्य मागण्यांचे निवेदनही आ. चौगुले यांच्याकडे देण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी, विद्यमान मुख्यमंत्री व सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले तसेच मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी सत्कार समितीचे अध्यक्ष प्रभाकर हिरवे, जगन पाटील, शंकर पाटील,सहदेव गायकवाड, प्रदीप शिवनेचारी, कसगी सरपंच हनमंत गुरव, कदेरचे सरपंच सतीश जाधव, आदीसह नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...