आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:उपविभागीय अभियंता राजेंद्र पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नागरी सत्कार

उमरगा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र संभाजीराव पाटील यांचा मंगळवारी (दि. ७) शांताई मंगल कार्यालयात सेवानिवृत्तीनिमित्त सपत्निक सत्कार करण्यात आला. माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड अध्यक्षस्थानी होते.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, उद्योजक सुनील माने, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता नितीन भोसले, उपविभागीय अभियंता व्ही. जी. चिडगुपकर, ज्येष्ठ नेते डॉ. चंद्रकांत महाजन, डॉ. कपिल महाजन उपस्थित होते. १९९३ ते २०२२ या २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवा करून नियत वयोमानानुसार निवृत्त झालेले उपविभागीय अभियंता पाटील यांचा मान्यवरांनी सत्कार करून प्रामाणिक व तत्पर सेवेचे कौतुक केले. प्रा. जीवन जाधव यांनी प्रास्ताविक केले या वेळी प्रा. शिवाजीराव वडणे, प्रा बिराजदार, प्रा. जीवनराव जाधव आदींनी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. सेवा निवृत्ती कार्यक्रमास विजयकुमार काळे,शिवानंद बिराजदार, प्रा. राजेंद्र वाकडे, शाखा अभियंता सुनील घोडके, दत्तात्रय वाडेकर, कल्लेश्वर जाधव, रमेश बिराजदार, प्रदीप पाटील, बापू बिराजदार, निरंजन कुलकर्णी, मुन्ना बिराजदार, बाळू बिराजदार, प्राचार्य कवलजीत बिराजदार, रणजित पाटील, प्रा. सतीश इंगळे यांच्यासह बांधकाम विभागातील कर्मचारी, कंत्राटदार, नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...