आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृती समिती बैठकीत निर्णय:वर्ग दोन जमिनीची नोंद रद्द करण्यासाठी मोर्चा काढणार

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह जिल्ह्यातील वर्ग-२ च्या जमिनीची वर्ग-१ मध्ये नोंद घेण्याच्या मागणीसंदर्भात सोमवारी बैठकीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. उस्मानाबाद शहर व जिल्ह्यातील वर्ग-२ जमिनींचे वर्ग-एक मध्ये रूपांतराच्या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून वर्ग २ जमिनींचे मालक पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात एक महत्त्वाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. त्यावरही शासनाने निर्णय घेतला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ग-१ असलेल्या जमिनी वर्ग-२ करून शेतकऱ्यांवर अन्याय केला.

याचा निषेध म्हणून शेतकरी बचा कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकारात्मक निर्णय न घेतल्यास शेतकरी, प्लॉटधारक व व्यापारी हे पालकमंत्री, खासदार व आमदारांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा दिला. बैठकीस कृती समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश राजे, सचिव मनोज राजेनिंबाळकर, उपाध्यक्ष सुभाष पवार, अर्जुन पवार, अभिजीत देशमुख, विजय देशमुख आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...