आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या आठवणींना‎ उजाळा:25 वर्षानंतर भेटल्या वर्ग मैत्रिणी‎

तुळजापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील ‎दहावीच्या वर्गमैत्रीणी तब्बल २५ ‎वर्षानंतर पुन्हा भेटल्या.यावेळी ‎जिवलग वर्ग मैत्रिणींनी त्यांच्या ‎शिक्षकांसह जुन्या आठवणींना‎ उजाळा दिला.‎ शहरातील जिल्हा परिषद कन्या‎ प्रशालेचा सन १९९६ - ९७ च्या‎ दहावीच्या बॅच चा स्नेहमेळावा‎ झाला. या वेळी २५ वर्ग मैत्रिणींची‎ उपस्थिती होती. या मेळाव्यासाठी‎ त्या वेळच्या शिक्षकांना आवर्जून‎ निमंत्रित करण्यात आले होते.

या‎ स्नेह मेळाव्यासाठी अमृता मलबा,‎ शैलजा गवळी, गौरी देशमुख,‎ अरुंधती कुलकर्णी या स्थानिक‎ वर्गमैत्रिणींनी पुढाकार घेतला होता.‎ यावेळी शिक्षकांचा सत्कार करण्यात‎ आला. यावेळी बोलताना मैत्रिणींनी‎ आठवणींना उजाळा दिला तर‎ शिक्षकांनी विद्यार्थ्यीनींचे कौतुक‎ केले. शेवटच्या सत्रात संगित‎ मैफिलीचा आनंद घेतला. यावेळी‎ चौधरी, आंबेकर, राऊत, पारधे,‎ आचलेरकर, जळके आदी‎ शिक्षिकांची उपस्थित होती.‎ सुत्रसंचालन शैलजा गवळी, स्वाती‎ देशमुख व शुभांगी कदम यांनी तर‎ आभार अमृता मलबा यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...