आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव जल्लोषात साजरा:क्लीन समता ग्रीन समतातर्फे अमृत महोत्सव जल्लोषात ; मान्यवरांचे सत्कार

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशसेवा आणि आरोग्यसेवा या दोन्ही महत्वपूर्ण बाबी आहेत. देशसेवेसोबत आरोग्यसेवा ही सुद्धा एक देशसेवाच आहे.आज क्लीन समता ग्रीन समता परिवारातर्फे या दोन्ही सेवा निस्वार्थ भावनेने पार पाडलेल्या बुवासाहेब जाधव आणि जनाब अजीज हैदरसाब शेख यांच्या उपस्थितीत आझादीचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.

मराठवाडा मुक्ति संग्रामामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यामध्ये स्वातंत्र्यसैनिक बुवासाहेब जाधव हेही अग्रेसर होते. त्यांनी या लढ्यामध्ये आपल्या जीवाचे रान केले होते. राज्य परिवहन महामंडळामध्ये कार्यरत असताना चालू केलेल्या कावीळ या व्याधीवरील औषधामुळे ज़नाब अजिज हैदरसाब शेख हे महाराष्ट्रतील घराघरात पोहोचले. त्यांच्या औषधामुळे आज कित्येक रूग्णांना काविळीपासून सुटका मिळाली आहे.स्वातंत्र्यसेवा आणि आरोग्यसेवा या दोन्हीच महत्व लक्षात घेऊन क्लीन समता ग्रीन समता परिवारतर्फे उस्मानाबादच्या या दोन्ही मान्यवरांचा परिवाराचे अध्यक्ष नाना घाटगे, सचिव महेश काटे,पत्रकार सयाजी शेळके, अॅड. अर्जुन नायकवाडी, दिशा पतसंस्थेचे सचिव पंकज पडवळ तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल सौ. रागिणी पाटील यांचे नाना घाटगे यांनी आभार मानले.दरम्यान जिल्हयात अमृतमहोत्सवानिमित्त विविध सामाजिक संस्थांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन झाले.

बातम्या आणखी आहेत...