आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगले पाणी उपलब्ध:विसर्जन विहिरीची सफाई सुरू, 2 दिवसांत होणार पूर्ण

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सार्वजनिक, घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी तयार केलेल्या विहिरीची सफाई सुरू झाली आहे. ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून त्याअगोदर म्हणजेच दाेन दिवसात हे काम संपण्याचे संकेत प्रशासनाकडून मिळत आहेत. नगरपरिषदेने गेल्या वर्षी विसर्जन विहिरीची दुरुस्ती करुन तिला कठडे तयार केले. लाखो रुपये खर्च करुन ही विहिर तयार करण्यात आली आहे. या विहिरीत मोठ्या प्रमाणात मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. शहरातील घरगुती अनेक सार्वजनीक मंडळाच्या मोठ्या मूर्तींचेही येथेच विसर्जन करण्यात येते. गेल्यावर्षी गणेशोत्सवात विसर्जन झालेल्या मूर्तींचा गाळ मोठ्या प्रमाणात साचून राहिला होता. त्यात घाणही साचली होती. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्वापूर्वी पालिकेने मूर्ती विसर्जन करण्यासाठी विहिरीची सफाई करणे गरजेचे असल्याने तेथे क्रेनच्या सहाय्याने मलबा काढण्याचे काम सुरु केले आहे. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याचे काम झाले असून अद्यापही निम्म्या विहिरीची सफाई बाकी असून यात साधारण १५ ते २० फुटांचा गाळ आहे. आगामी दोन दिवसात सर्व सफाई करुन त्यात चांगले पाणी आणून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे भक्तांना मूर्ती विसर्जन करण्यासाठी चांगले पाणी उपलब्ध होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...