आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहिम:वर्धापनदिनानिमित्त भूम गृहरक्षक दलांकडून स्वच्छता मोहिम

भूम3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील गृहरक्षक दलाकडून ७६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध समाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील ५६ गृहरक्षक दला कडून शहरातील ७६व्या वर्धापन दिनानिमित्ताने ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता अभियान व रुग्णांना फळे,बिस्किटांचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामदैवत अल्लमप्रभू यात्रेचे औचित्य साधत मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

यावेळी गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक मयूर शाळू, औदुंबर जाधव, नाना वीर, संभाजी चौधरी, रज्जाक सापवाले, अमोल जाधव, अंकुश थोरात यांच्यासह मोठ्या प्रमाणात गृहरक्षक दलातील महिलांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...