आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांची जगण्यासाठी धडपड:एकुरगावाडी येथे अनाथ अपंग विद्यार्थ्यांना कपडे व मिष्टान्न भोजन

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एकूरगावाडी श्री तुळजाभवानी मतिमंद व अनाथ आश्रम शाळेत गेल्या १५ वर्षा पासून साठ ते सत्तर बालके आश्रयास आहेत. विविध सार्वजनिक ठिकाणातून अनाथ म्हणून मिळून आलेली आहेत. यात बहुतांश बालके मतिमंद व अनाथ आहेत.कोवळे वयात बालके अनाथालय दाखल झाल्याने आपण कुठे जन्मलो, आईवडील कोण या बाबत कल्पना नाही. बुद्धांकाप्रमाणे शिक्षण देवुन आश्रम शाळेत बालकांची जगण्यासाठी धडपड सुरू आहे.

उमरगा येथील आशोक मुक्ता, शाहूराज कदेरे, दयानंद पुदाले, बाळू शिंदे, राजू बटगीरे,कविता मुक्ता,संध्या पुदाले, लक्ष्मी स्वामी मेघा विरनाळे, सुष्मा मुक्ता, शिवप्रसाद भालके हि मंडळी समाजसेवेच्या भावनेतून सात वर्षापासून दिवाळी साजरा करित आहेत. या अनाथ बालकांना दिवाळी सणाचा आनंद घेता यावा यासाठी महिलांनी ओवाळणी करून भाऊबीज साजरी केली. सर्व बालकांना कपड्यांचे व फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी बालकांनी विविध गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

संस्थाध्यक्ष गोविंद शिंदे, सचिव मुख्याध्यापक बालाजी शिंदे, विकास शिंदे, अधिक्षक गजानन शेवाळे, किशोर जाधव, सिध्दांत सोनकांबळे, स्वप्नील जमादार, शिवलींग दुर्गे, काशिमसाहेब सरनौबत यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या मुलांच्या पालन पोषणाची विशेष खबरदारी घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...