आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ढगाळ वातावरण रब्बी हंगामातील ज्वारीला पोषक‎

परंडा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात रब्बी हंगामाची सरासरी‎ ७५ टक्के पेरणी झाली असून रब्बी‎ ज्वारीची सन २०२२-२३ मध्ये‎ १७८३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी‎ झाली.सध्या ढगाळ वातावरण रब्बी‎ हंगामातील ज्वारीला पोषक मानले‎ जाते. त्यामुळे ज्वारीचे कोठार‎ भरणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या‎ आशा पल्लवीत झाल्या आहेत.‎ आरोग्यासाठी कडधान्यास‎ पारंपरिक महत्व असून त्यामुळे‎ त्यास आता पौष्टिक तृणधान्य‎ म्हणून ओळखले जाते.

ज्वारी,‎ बाजरी, नाचणी, वरई, राळा कोडो,‎ कुटकी, सावा, राजगिरा ही पौष्टिक‎ तृणधान्य काळाच्या ओघात मागे‎ पडली. या पिकांच्या उत्पादन,‎ उत्पन्न, आहार यात वाढ‎ करण्याच्या उद्देशाने यंदाचे २०२३ हे‎ वर्ष ''आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य‎ वर्ष'' म्हणून साजरे केले जात आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यामुळे या नविन वर्षांत परंडा‎ तालुक्यातील ज्वारीला नक्कीच‎ मागणी वाढेल व ज्वारी उत्पादक‎ शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्याची‎ आशा निर्माण झाली आहे.

परंडा‎ तालुका हा ज्वारीचे कोठार अशी‎ ओळख असलेल्या तालुक्यातील‎ पांढरी शुभ्र ज्युट, मालदांडी, दगडी‎ व माळ दगड अशा पाणीदार व‎ चवदार ज्वारी म्हणून या भागातील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ज्वारीला मुंबई, पुणे, कोल्हापूर,‎ सोलापूर येथे मोठ्या प्रमाणात‎ मागणी असते. तालुक्यात सलग‎ तीन वर्ष समाधानकारक पाऊस‎ झाल्यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढले‎ त्यामुळे ऊसाचे क्षेत्रात वाढ झाल्याने‎ रब्बी ज्वारी ची ५९ टक्के पेरणी‎ झाली.बहुतांश ज्वारी पिक पोठऱ्यात‎ व निसवलेले असून कणसे लागली‎ असून तालुक्यात पीक परिस्थिती‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चांगली आहे.

ढगाळ वातावरणामुळे‎ द्राक्ष, केळी, पपई, पेरू, सिताफळ,‎ कांदा व कापूस यावर रोगराई‎ वाढल्यामुळे उत्पादक शेतकरी‎ फवारणी करून हतबल झाला‎ आहे.ढगाळ वातावरणामुळे गहु व‎ हरभरा पिकांना धोका होण्याची‎ शक्यता शेतकरी वर्तवीत आहेत.‎ तालुक्यात रब्बी हंगामाचे सरासरी‎ ४३६७९ हेक्टर क्षेत्र असुन ३२७४८‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ हेक्टरवर रब्बी हंगामातील पेरणी‎ झाली आहे.

रब्बी ज्वारीचे सरासरी‎ ३००६८.हेक्टर क्षेत्र असुन रब्बी‎ हंगामात फक्त १७८३४ हेक्टरवर‎ (५९ टक्के) पेरणी झाली.गतवर्षी‎ रब्बी ज्वारीचे क्षेत्रात घट झाल्याने‎ भाव सध्या गगनाला भिडले‎ आहेत.बाजारात ज्वारीच नसल्याने‎ ज्वारीचे ४० ते ५० रुपये प्रती किलो‎ दर आहेत.‎

सरकारने हमी भाव द्यावा‎
यावर्षी परतीच्या पावसाने ज्वारी साधली आता कणस बाहेर पडली‎ आहेत.यावर्षी चांगला उतारा पडणार असुन मागच्या वर्षाची कसर भरुन‎ निघणार परंतु बाजारात ज्वारी आली की भाव कमी होता सरकारने ज्वारीला‎ हमी भाव मिळावा.‎ तानाजी पाटील, शेतकरी.‎तालुक्यात सन २०२२-२३ मध्ये ऊसाचे क्षेत्र वाढल्यामुळे रब्बीहंग‎ ामातज्वारी ची ५९ टक्के पेरणी झाली असुन पिक परिस्थिती समाधानकारक‎ असुन रब्बी ज्वारीच्या उत्पादनात वाढ होणार आहे.सध्याच्या वातावरणाचा‎ कसलाही परिनाम ज्वारीवर होणार नाही--‎ ए.यु.रुपनवर , तालुका कृषि अधिकारी , परंडा.‎

बातम्या आणखी आहेत...