आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन व्यवस्था:कळंबमध्ये घरोघरी लहान मूर्तींचे संकलन

कळंब21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जनाच्या दिवशी रस्त्यावर गर्दी होऊ नये व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कळंब पालिकेने घरोघरी जात लहान गणेश मूर्तींचे संकलन करून पंचायत समिती जवळील विहिरीत विसर्जन व मोठ्या मूर्तींचे केज रोडवरील मांजरा नदीवरील लहान पुलाजवळ विसर्जन व्यवस्था केली आहे.

विसर्जनासाठी कळंब पालिकेने विशेष उपाययोजना केल्या आहेत. कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन छोट्या मूर्तींचे संकलन करणार आहेत. सर्व नागरिकांनी या सूचनांचे पालन करून बाप्पाला निरोप देण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, मुख्याधिकारी शैला डाके, पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांनी केले. मोठ्या गणेश मूर्तीचे विसर्जन मांजरा नदीवरील लहान पुलाजवळ होणार आहे. विसर्जनाच्या वेळी काही गोताखोर व कर्मचारी असणार आहेत, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक संजय हाजगुडे यांनी दिली. घरोघरी जाऊन छोट्या मूर्ती संकलनासाठी आठ छोटा हत्ती वाहनांची सोय केली. ही वाहने आरोग्य व स्वच्छता विभागाने निर्धारित केलेल्या कळंबच्या आठ झोनमध्ये दिवसभर फिरुन मूर्तींचे विसर्जन करणार आहेत.

पोलिस बंदोबस्तात होणार मूर्तींचे विसर्जन
एकत्र केलेल्या सर्व मूर्तींचे विसर्जन कळंब पंचायत समिती येथील विहीरवर आणून आरती करत केले जाणार आहे. तेथे पालिकेचे कर्मचारी, सर्वपक्षीय, अधिकारी, कर्मचारी, महसूल, पोलिस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित असणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...