आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्हाधिकाऱ्यांचे शहर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश; अनधिकृत फलक लावल्यास कारवाई

उस्मानाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अस्वच्छतेचा पावसाळ्यात नागरिकांना अधिक त्रास जाणवणार आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी बैठकीत शहरात स्वच्छता ठेवण्याचे कडक शब्दात निर्देश दिले. सिंगज युज प्लास्टिक वापरणारे व विक्रेत्यांवरही कारवाईसाठी निर्देशित केले आहे. यासंदर्भात कारवाई करून अहवाल सादर करण्याबाबतही बजावण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळामार्फत एकल वापर (सिंगल यूज) प्लास्टिकचा वापर बंद करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील स्वच्छतेबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी असे निर्देश दिले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद येथील अधिकारी उपस्थित होते. यावेळी शहरातील स्वच्छतेबाबत अनेक तक्रारी असल्याचे दिसून आले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेण्यास सांगितले आहे. उस्मानाबादेत कचरा व्यवस्थापन एक समस्येचे रूप घेत आहे. कचऱ्याचे विलगीकरण विहीत कार्यपद्धतीत होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच नाल्यांचीही दुरवस्था झाली आहे. नाल्यांचे बीओडी लेव्हल तपासून रिपोर्ट सादर करण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ओला कचरा आणि सुका कचरा विल्हेवाट कशाप्रकारे लावली जात आहे, शहरात स्वच्छतेसाठी अधिक पाउल उचलण्याचे त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सिंगल युज प्लास्टिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. दुकानदार आणि नागरिकांनी तात्काळ प्लास्टिकचा वापर बंद करून पर्यावरणाला वाचवण्यास सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. दिवेगावकर यांनी नगर परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर जिल्ह्यात सर्व ठिकाणी कार्यवाही करण्याचे आणि दंड वसूल करण्याचे निर्देश दिले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करून देणार अहवाल
शहरात बॅनर आणि होर्डिंग लावलेले आहेत. यामुळे रस्ते गायब झाले आहेत. वाहनधारकांन वाहने चालवताना अडचणी येत आहेत. अनाधिकृतपणे बॅनर होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर कोणाचाही अंकुष राहिलेला नाही. त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचेही जिल्हाधिकारी दिवेगावकर यावेळी निर्देश दिले.

शासकीय कार्यालयात प्लास्टिक बॉटल बंद करण्याच्या सूचना
उपस्थित अधिकाऱ्यांना कार्यालय,बैठकीत प्लास्टिकच्या पाणी बॉटल न वापरण्याबबतही सूचना दिल्या. पाणी संपल्यानंतर बाटली तशीच टाकून दिली जाते. यामुळे प्लास्टिक कचऱ्यामध्ये वाढ होत आहे. यामुळे विविध कामानिमित्त विविध कार्यालयात येणाऱ्या अभ्यांगतांना जार किंवा फिल्टरचे पाणी काचेच्या जग आणि ग्लासमध्ये देण्याबाबत जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी बजावले.

बातम्या आणखी आहेत...