आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:महाविद्यालयाचा निकाल 98 टक्के; सावित्रीबाई फुले विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कळंब9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात इयत्ता १० वी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालय व महाविद्यालयाचा निकाल ९८ टक्के लागला. वाणिज्य शाखेतील सानिका चोंदे, जिनत सय्यद, पूजा चवरे. कला शाखेतून वैष्णवी मिसाळ, दीपाली फुगारे, साक्षी जाधव. विज्ञान शाखेतून पल्लवी मुंडे, साक्षी पवार, ऋतुजा माळकर तसेच विद्यालयातील श्रावणी शेळके, मयुरी मनके, आर्या मुंडे, अक्षदा गव्हाणे, वैष्णवी कापसे, आश्लेषा खरडकर, प्रगती कसाब, वैभवी माने, नम्रता मुळीक, आदिती गाडे, ज्ञानेश्वरी तामाने, सिद्धेश भवर, साक्षी परकाळे, प्रज्ञा मेनकुदळे, विठ्ठलसिंह ठाकूर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य जे. डी. कुपकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामकृष्ण लोंढे, सचिन डोमे, सत्यप्रेम वारे, संस्थेच्या अध्यक्षा मनोरमा शेळके, कार्याध्यक्ष श्रीधर भवर, डॉ. बाळकृष्ण भवर, उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी शिंदे भवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख काकासाहेब मुंडे यांनी तर आभार जीवनसिंह ठाकूर यांनी मानले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...