आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न:आ. चौगुलेंनी अधिवेशनात मांडले‎ शहर, तालुक्यातील मूलभूत प्रश्न‎

उमरगा‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎उमरगा-लोहारा ‎मतदार संघातील अनेक मुलभूत प्रश्न आमदार‎ ज्ञानराज चौगुले यांनी‎ अर्थसंकल्पीय ‎अधिवेशनात गृह,‎ उद्योग, जलसंपदा, ऊर्जा, स्वच्छता व‎ पाणीपुरवठा विभागातील चर्चेत सहभाग‎ घेत औद्योगिक वसाहत, पोलिस,‎ महावितरण, सिंचन, ग्रामीण भागातील‎ पाणीपुरवठा यासंबंधी प्रश्न मांडून‎ सभागृहाचे लक्ष वेधले.‎उमरगा शहरातील पोलिस वसाहतीचा‎ बीओटी तत्त्वावर विकास करणे,‎ उमरगा-लोहारा व मुरूम पोलिस‎ ठाण्यातील पोलिस दलात वाढ करणे,‎ औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलिस ठाणे,‎ महावितरण कार्यालयात नव्याने एक‎ सहायक अभियंता आणि ११ तांत्रिक‎ कामगारांची पदे भरणे, उमरगा शहरासाठी‎ अतिरिक्त ३२ केव्ही विद्युत उपकेंद्र‎ उभारणे, उमरगा-लोहारा तालुक्यात‎ आरडीएसएच योजनेत मंजूर असलेल्या‎ विविध वीज उपकेंद्रास निधी, औद्योगिक‎ वसाहतीचा हद्द वाढ प्रस्ताव, मराठवाडा‎ सिंचन प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना‎ क्र. २ मधील टप्पा क्र.६ (रामदरा ते‎ एकुरगा) ला प्राधान्यक्रम देऊन निविदा‎ प्रक्रिया पूर्ण करणे आदी विषय मांडले.‎

दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत उमरगा‎ व लोहारा तालुक्यातील बहुतांश गावांसाठी‎ कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर‎ असून उमरगा येथे ग्रामीण पाणीपुरवठा‎ उपविभागीय कार्यालयही मंजूर झाले‎ असल्यामुळे दोन्ही तालुक्यांतील‎ पाणीपुरवठा विभागातील सर्व रिक्त पदे‎ तत्काळ भरावीत. शिवाय उमरगा‎ तालुक्यात २९ साठवण तलावांचे व आष्टा‎ लिंक कॅनलच्या दुरुस्तीसाठी निधीची‎ मागणीही चौगुले यांनी केली.‎

बातम्या आणखी आहेत...